JIO : दीर्घकाळ वैधता, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल बरेच काही, किमंत फक्त 240 रुपये

JIO : दीर्घकाळ वैधता, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल बरेच काही, किमंत फक्त 240 रुपये
HIGHLIGHTS

JIOचा 84 दिवसांच्या वैधतेसह येणार प्लॅन

प्लॅनचा मासिक खर्च केवळ 240 रुपये

भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंगसह मिळतील बरेच बेनिफिट्स

रिलायन्स JIO देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे ग्राहकांसाठी प्रत्येक किंमत श्रेणीमध्ये आणि मासिक आणि दीर्घकाळ ववधतेसह उत्तम बेनिफिट्ससह येणारे प्लॅन्स आहेत. आता बरेच लोक या गोंधळात असत की, मासिक रिचार्ज प्लॅन घ्यावा की दीर्घकाळ वैधतेसह येणारे प्लॅन्स घ्यावेत. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, मासिक रिचार्ज प्लॅनच्या तुलनेत दीर्घकाळ वैधतेसह येणारे प्लॅन्स तुम्हाला अधिक फायदे देतात. कसे ते बघुयात- 

JIOचा 719 रुपयांचा प्लॅन 

JIOच्या या प्लॅनमध्ये एकूण 84 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण डेटा 168GB मिळतो. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMSची देखील सुविधा देण्यात आली आहे. तर, या प्लॅनचा मासिक खर्च 240 रुपये आहे. 

आता बघुयात मासिक वैधतेसह येणाऱ्या रिचार्ज प्लॅन्सचे फायदे : 

JIOचा 219 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 14 दिवसांची वैधता दिली जाते. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा ऑफर केला जातो आणि अतिरिक्त 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 44GB डेटा मिळतो. याशिवाय, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMSची देखील सुविधा देण्यात आली आहे. त्याबरोबरच, JIO ऍप्सचे सब्स्क्रिप्शन देखील दिले जाते. 

जर आपण दोन्ही प्लॅन्सबद्दल चर्चा केली तर, 719 रुपयांचा प्लॅनसह मासिक खर्च 240 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 30 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. मात्र, 219 रुपयांचा प्लॅनमध्ये केवळ 14 दिवसांची वैधता येते. जर तुम्हाला जास्त दिवसांच्या वैधतेसह अनेक बेनिफिट्स देखील हवेत आहेत. तर, इतर बेनिफिट्ससह मासिक खर्च बघायला गेलो तर दीर्घ वैधतेसह येणारे प्लॅन्स तुमच्यासाठी योग्य ठरतात. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo