रिलायन्स Jio आणि Vodafone Idea VI या दोन्ही भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज म्हणून ओळखले जातात. दोन्ही कंपन्यांकडे सामान किमतीत अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. विशेष म्हणजे टेलिकॉम दिग्गज आपल्या प्लॅन्समध्ये आकर्षक OTT बेनिफिट्स देखील घेऊन येतात. या रिपोर्टमध्ये आम्ही 700 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये पोस्टपेड प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
Jio आणि Vodafone Idea दोन्ही संपूर्ण भारतातील 4G दूरसंचार सेवा प्रदाता आहेत. दरम्यान, Jio आता मोफत 5G नेटवर्क देखील ऑफर करत आहे. मात्र, VI सध्या भारतातील फक्त पुणे आणि दिल्ली या दोन शहरात 5G सेवा पुरवत आहे. पण असे असूनही VI कंपनीचे प्लॅन्स JIO च्या प्लॅन्सना बरोबर टक्कर देतात. या लेखात आम्ही तुम्हाला Jio च्या 699 रुपये आणि VI च्या 701 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
Vodafone Idea चा 701 रुपयांचा प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, अमर्यादित डेटा आणि 3000 SMS सह प्रति महिना येतो. या प्लॅनमध्ये डेटा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या प्लॅनमध्ये मिळणारे अतिरिक्त फायदे हे 1 महिन्याचे मोफत हंगामा म्युझिक, Vi Movies & TV आणि Vi Games आहेत.
याशिवाय, OTT बेनिफिट्समध्ये ग्राहक Amazon Prime, Disney + Hotstar 6 महिन्यांसाठी, SonyLIV 12 महिन्यांसाठी, SunNXT, Swiggy, EazyDiner, Norton आणि EaseMyTrip यापैकी कोणतेही तीन निवडू शकतात.
रिलायन्स Jio च्या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये दररोज एकूण 100GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. वापरकर्ते या प्लॅनसह 3 अतिरिक्त सिम घेऊ शकतात, ज्यासाठी प्रत्येकी 99 रुपये प्रति महिना खर्च येईल. त्याबरोबरच, प्रत्येक अतिरिक्त सिमवर दरमहा 5GB डेटा दिला जाईल. हा प्लान वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील देतो. त्यामुळे जर तुमच्याकडे 5G फोन असेल तर Jio सोबत तुम्हाला डेटाची काळजी करण्याची गरज नाही.
या प्लॅनसह येणाऱ्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Netflix (मोबाइल), Amazon Prime, JioTV, JioCinema आणि JioCloud चे ऍक्सेस मिळणार आहे.