भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्स JIO ने भारतात तिची True 5G पॉवरवर चालणारी सार्वजनिक WiFi सेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, नवीन Jio True 5G पब्लिक WiFi सेवेचा लाभ सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होईल.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy A04e HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह लाँच, बघा आणखी जबरदस्त फीचर्स
कंपनी WiFi च्या मदतीने 5G इंटरनेट स्पीडचा फायदा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक राहतात अशा ठिकाणी देणार आहे. या ठिकाणी शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, व्यावसायिक हब आणि इतर ठिकाणांचा समावेश असू शकतो. कंपनीने राजस्थानमधील नाथद्वारा या शहरात ही WiFi सेवा सुरू केली आहे.
नाथद्वारामध्ये, रिलायन्स JIO वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफरसह ट्रू 5G आधारित WiFi सेवेचा लाभ मोफत दिला जात आहे. त्याबरोबरच, नॉन-JIO वापरकर्त्यांना ही सेवा वापरण्याचा पर्याय देखील मिळेल. तसेच ते इच्छित असल्यास अमर्यादित Jio 5G स्पीडसाठी Jio वर स्विच करू शकतात.
आकाश अंबानी यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नवीन सेवेसह, ते जास्तीत जास्त वापरकर्त्यांना 5G अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे. 5G सेवा केवळ निवडक वापरकर्त्यांपुरती मर्यादित ठेवू इच्छित नाही. प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, कंपनीचे 5G WiFi हॉटस्पॉट इतर ठिकाणी देखील सेट केले जातील.
रिलायन्स JIO ने चार शहरांमध्ये 5G रोलआउट सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनंतर, आता कंपनीची 5G सेवा चेन्नईमध्येही सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीनंतर चेन्नईमधील वापरकर्ते कंपनीच्या वेलकम ऑफरचा भाग बनू शकतात. MyJio ऍपवर गेल्यानंतर, या ऑफरसाठी नोंदणी करण्याचा पर्याय मिळेल.