भारतातील टेलिकॉम विश्वातील दिग्गज रिलायन्स Jio ने सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी 5G सर्व्हिस आणली आहे. जर तुम्ही Jio चे ग्राहक आणि 5G फोन वापरकर्ते असाल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही 239 रुपये किंवा त्यावरील कंपनीच्या सर्व रिचार्जवर तुम्ही 5G स्पीडसह इंटरनेट वापरू शकता. पण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला पाच सर्वोत्तम Jio 5G प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.
त Jio चा हा सर्वात स्वस्त 5G प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये यूजर्सना 28 दिवसांची संपूर्ण वैधता मिळत आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, दररोज 1.5GB डेटा म्हणजेच एकूण 42GB डेटा मिळेल. युजर्सना दररोज 100SMS, अमर्यादित कॉल्स आणि जिओ Apps चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल.
या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळेल. हा प्लॅन दररोज 2GB डेटा आणि 100 SMS च्या सुविधेसह येतो. प्लॅनमध्ये उपलब्ध इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोफत अमर्यादित कॉलिंगसह Jio Saavn Pro आणि Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
ही कंपनीची लेटेस्ट एन्टरटेंमेंट प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये Netflix मोबाईल एडिशनचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तर हा प्लॅन दररोज 2GB डेटा, 100SMS आणि अमर्यादित मोफत कॉलिंगचा लाभ उपलब्ध आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.
हा रिचार्ज कंपनीच्या वेबसाइटवर व्हॅल्यू प्लॅन कॅटेगरीमध्ये सूचीबद्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये एकूण 24GB डेटा, 3600 SMS, अमर्यादित कॉल आणि Jio Apps चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
हा प्लॅन या यादीतील सर्वात महागडा आहे.. हा एक लॉन्ग टर्म प्लॅन आहे, जी अप्रतिम फायद्यांसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, या प्लॅनची वैधता 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षांची आहे.