JIO ने आणखी 27 शहरांमध्ये लाँच केली 5G, महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश ?

JIO ने आणखी 27 शहरांमध्ये लाँच केली 5G, महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश ?
HIGHLIGHTS

JIO ने आणखी 27 शहरांमध्ये ही सेवा लाँच केली.

महाराष्ट्रातील 'या' शहरात 5G सेवा सुरु

आतापर्यंत महाराष्ट्रात 17 शहरांमध्ये JIO 5G सेवा सुरु

भारतात रिलायन्स JIO आणि AIRTEL या टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5G सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स JIO कंपनी सर्वात आघाडीवर आहे. रिलायन्स JIO ही देशात सर्वत्र आपले 5G नेटवर्क वेगाने पसरवत आहे. JIO ने आणखी 27 शहरांमध्ये ही सेवा लाँच केली आहे. यादीत महाराष्ट्रातील काही शहरांचा देखील समावेश आहे. बघुयात कोणते… 

 कंपनीच्या प्रत्येक वापरकर्त्याने Jio True 5G सेवेचा लाभ घ्यावा ही आमची इच्छा आहे, असे रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले. वर्षाअखेरीस प्रत्येक शहर आणि गावात 5G सेवा सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

हे सुद्धा वाचा : महत्त्वाचे ! Uber वर 90 दिवस अगोदर बुक करता येईल कॅब, लवकरच येणार नवे फिचर 

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये 5G सेवा सुरु 

नव्याने 5G सेव सुरु झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ एकाच शहराचा समावेश आहे. राज्यातील 'सातारा' शहराचा समावेश करण्यात आला आहे. 

आतापर्यंत महाराष्ट्रातील 17 शहरांमध्ये JIO 5G सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा इ. शहरांमध्ये रिलायन्स JIO 5G सेवा सुरु झाली आहे.

देशातील आणखी 27 शहरांमध्ये 5G सेवा सुरु 

देशात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील 27 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. बुधवारपासून, 27 शहरांमधील रिलायन्स JIO वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय जिओ वेलकम ऑफर अंतर्गत 1 Gbps किंवा स्पीडवर अमर्यादित डेटा वापरण्यास सक्षम असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo