आपणा सर्वांना माहितीच आहे की, Jio आणि Airtel भारतातील सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. त्याबरोबरच दोन्ही कंपन्या एकमेकांच्या जबरदस्त प्रतिस्पर्धी आहेत. मासिक रिचार्ज करणे अनेकदा त्रासदायक असतात. म्हणून आजकाल युजर्स दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या प्लॅनसह अधिकतर रिचार्ज करतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Airtel आणि Reliance Jio च्या दीर्घकालीन प्रीपेड प्लॅन्सची तुलना करून सांगणार आहोत. चला बघुयात सविस्तर-
Airtel संपूर्ण 60 दिवसांच्या वैधतेसह 519 रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटाचा ऍक्सेस मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्स अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100SMS आणि 90GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहकांना अपोलो 24|7 सर्कल, प्री-हॅलो ट्यून्स, 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
Jio देखील जवळपास समान किंमत श्रेणीमध्ये म्हणजेच 529 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन दररोज 1.5GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 84GB डेटा मिळेल. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100SMS आणि सर्व टेलिकॉम नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.
याशिवाय, इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ग्राहकांना Jio Saavn Pro चे सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित 5G डेटासह Jio Suite चे ऍक्सेस देखील मिळेल.
वरील दोन्ही प्लॅन्स बघता दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये समान डेटा आणि कॉलिंग फायदे मिळत आहे. Airtel चा 519 प्लॅन अधिक परवडणारा आणि बेनिफिट्ससह युक्त दिसतोय. Jio पेक्षा 10 रुपयांच्या कमी किमतीत Airtel आपल्या ग्राहकांना अधिक डेटा, अधिक वैधता आणि अतिरिक्त ॲप्सचे फायदे आणि अगदी फास्टॅग कॅशबॅक ऑफर करते.