Jio कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रकारचे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन सादर करत असते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा दोन प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत, जे भरपूर दैनंदिन डेटासह एका महिन्याची वैधता देतात. विशेष म्हणजे या दोन्ही प्लॅन्सच्या किमतीत केवळ एका रुपयाचे अंतर आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
कथित प्लॅन्स Jio चे दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यांची किंमत 448 आणि 449 रुपये इतकी आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये फक्त 1 रुपयाचा फरक आहे. पण, 1 रुपयांच्या फरकासह, हे प्लॅन्स तुम्हाला भरपूर बेनिफिट्स देतात. लक्षात घ्या की, या प्लॅन्सची वैधता समान आहे. मात्र, तुम्हाला डेटा लाभांमध्ये बराच फरक दिसेल. एक प्लॅन तुम्हाला दररोज 2GB डेटा देतो, तर दुसरा प्लॅन तुम्हाला 1 रुपये अधिक देऊन 2GB प्रति दिवसाऐवजी 3GB डेटा प्रतिदिन ऍक्सेस देतो.
Jio च्या 448 रुपयांचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. 2GB डेटानुसार, हा प्लॅन तुम्हाला वैधतेदरम्यान एकूण 56GB डेटाचा एक्सेस देणार. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा समावेश आहे. तसेच, या प्लॅनअंतर्गत तुम्ही दररोज 100 मोफत SMS देखील पाठवू शकता. एवढेच नाही तर, या प्लॅनसह तुम्हाला Jio Apps चे सबस्क्रिप्शन मिळेल, ज्यामध्ये 12 OTT ॲप्स समाविष्ट आहेत.
Jio च्या 449 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. मात्र, त्यात मिळणारे बेनिफिट्स जरा वेगळे आहेत. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन तुम्हाला दररोज 3GB डेली डेटा ऍक्सेस देतो. तर, 28 दिवसांच्या 3GB डेटाच्या वैधतेदरम्यान तुम्हाला 84GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील.