Jio 3GB Daily Data Plans: दररोज भरपूर डेटासह Unlimited बेनिफिट्सचा लाभ घ्या, OTT सब्स्क्रिप्शन देखील उपलब्ध। Tech News

Updated on 11-Dec-2023
HIGHLIGHTS

Reliance Jio चे दररोज 3GB डेटासह येणारे प्लॅन्स

तुम्हाला इतर लाभांसह विशेष OTT सब्स्क्रिप्शन देखील मिळतील.

प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासोबत तब्बल 40GB डेटा मोफत मिळतो.

Reliance Jio ही सध्या भारतीय टेलिकॉम कंपन्यांमधील एक अशी कंपनी आहे, जी वापरकर्त्यांच्या गरजेनुसार मोफत कॉलिंग आणि अधिक डेटासह येणारे प्लॅन्स ऑफर करते. कंपनीचा जवळजवळ प्रत्येक रिचार्ज पॅक अमर्यादित कॉल, डेटा आणि SMS सह येतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दररोज 3GB डेटासह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. एवढेच नाही, तर तुम्हाला इतर लाभांसह विशेष OTT सब्स्क्रिप्शन देखील मिळतील.

Jio चा 219 रुपयांचा प्लॅन

3GB डेटासह Jio चा सर्वात कमी किमतीत येणार प्लॅन आहे, जो 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत 2GB अतिरिक्त डेटा मिळतो. त्यानुसार, प्लॅनमध्ये एकूण 44GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यासोबतच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळतील. याशिवाय, काही Jio Apps ची सुविधा देखील रिचार्जसह उपलब्ध आहे.

Jio चा 399 रुपयांचा प्लॅन

Jio चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. रोजच्या 3GB डेटाशिवाय प्लॅनमध्ये 6GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. त्यानुसार प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा युजरला मिळेल. यासोबतच, नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगच्या सुविधेसोबत दररोज 100SMS आणि Jio Apps उपलब्ध आहेत.

Jio चा 999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासोबत 40GB डेटा मोफत मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 292GB डेटा या प्लॅनसह मिळेल. तसेच, यामध्ये तुम्हाला मोफत Jio Apps आणि दररोज 100SMS सोबत देशभरात कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग मिळेल.

Jio चा 1,499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवस आहे. वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे यामध्ये देखील फ्री कॉलिंग व्यतिरिक्त तुम्हाला दररोज 100 SMSचा लाभ देखील मिळेल. याशिवाय, ग्राहकांच्या मनोरंजनासाठी प्लॅनमध्ये Netflix Basic चे सबस्क्रिप्शन सुद्धा देण्यात आले आहे. यासह, तुम्ही तुमचे आवडते नवनवीन चित्रपट, वेब सिरिज आणि शोज बघण्याचा आनंद घेऊ शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :