दर महिन्याला फोन रिचार्ज करायला अगदी वैताग येतो. आता प्रत्येकजण वार्षिक रिचार्जची रक्कम घेऊ शकत नाही, म्हणून काही प्लॅन्स आहेत, ज्यांची वैधता 3 महिन्यांपर्यंत असते. Jio कडे 395 रुपयांचा असाच एक प्लॅन आहे. या योजनेची किंमत कमी आहे परंतु फायदे बरेच आहेत. यामध्ये यूजर्सना कॉलिंग आणि डेटासोबत इतर अनेक फायदे मिळतात. बघुयात सविस्तर…
हे सुद्धा वाचा : Motoचा नवीन 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल हाय-टेक सिक्योरिटी
या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाईल. यासोबतच एकूण 6 GB डेटा दिला जाणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये 1000 SMS दिले जात आहेत. डेटा आणि SMS सह कोणतेही FUP दिले जात नाही. यासोबत तुम्हाला जिओ ऍप्सचा मोफत प्रवेश दिला जाईल. प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.
395 रुपयांव्यतिरिक्त जिओचे काही प्लॅन देखील आहेत, जे 84 दिवसांच्या वैधतेसह येतात. यापैकी एक 666 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB डेटा दिला जाईल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाणार आहे. दररोज 100 SMS मिळणार आहेत. यासोबत जिओ ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही दिले जात आहे.
719 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैधता 84 दिवसांची आहे. यासोबतच अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS आणि Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.