फक्त 395 रुपयांमध्ये Jio चा हा सर्वात स्वस्त प्लॅन, 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल 5G स्पीड

Updated on 02-Mar-2023
HIGHLIGHTS

JIOचा 395 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये 5G स्पीडमध्ये अमर्यादित डेटाचा आनंद घेता येईल.

डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल.

Jio कडे त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी एकूण एक रिचार्ज प्लॅन्स आहेत. JIOकडे किफायतशीर प्लॅन्सपासून ते जबरदस्त बेनिफिट्ससह येणाऱ्या महागड्या प्लॅन्सपर्यंत सर्व श्रेणीतील प्लॅन्स आहेत. पण आज आम्ही तुमहहला एका एका खास प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत जवळपास तीन महिन्यांची वैधता मिळणारा प्लॅन आहे. बघुयात सविस्तर… 

हे सुद्धा वाचा :  Amazon होळी ऑफर ! 30 हजारांचा iQOO फोन फक्त 6 हजारात खरेदी करा, जबरदस्त फीचर

JIOचा 395 रुपयांचा प्लॅन

या Jio रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कंपनीकडून एकूण 6 GB हायस्पीड डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. 395 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1000 SMS सह 84 दिवसांची वैधता देखील मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. त्यामुळे डेटा संपल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही. 

तसेच, या प्लॅनसह वापरकर्त्यांना डेटा, कॉलिंग आणि SMS व्यतिरिक्त इतर अनेक फायदे मिळतात. जसे की, या प्लॅनसह रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या ऍप्सचा लाभ मिळेल. 

जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात Jio 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुम्ही या प्लॅनसह 5G स्पीडमध्ये अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकाल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :