फक्त 388 रुपयांत Disney+Hotstar 3 महिन्यांसाठी Free, ‘या’ प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा-कॉलिंग देखील उपलब्ध। Tech News 

फक्त 388 रुपयांत Disney+Hotstar 3 महिन्यांसाठी Free, ‘या’ प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा-कॉलिंग देखील उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Jio च्या अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह लोकप्रिय OTT ऍपचे सबस्क्रिप्शन उपलब्ध

Jio च्या अप्रतिम प्लॅनमध्ये Disney+Hotstar 3 महिन्यांसाठी मोफत मिळेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित फायदे देखील मिळणार आहेत.

OTT चे वाढते क्रेझ बघता Jio अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह त्याच्या वापरकर्त्यांना मोफत OTT बेनिफिट्स देत आहे. काही प्लॅनमध्ये तुम्हाला OTT बेनिफिट्समध्ये Netflix, Prime Video आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन प्लॅन्स थोडेसे महाग आहे, पण JIO च्या निवडक प्लॅनसह तुम्हाला यांचा मोफत लाभ घेता येईल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका Affordable प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यासह Disney+Hotstar 3 महिन्यांसाठी मोफत मिळेल.

OTT व्यतिरिक्त Jio प्लॅन अनेक आकर्षक बेनिफिट्ससह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित फायदे देखील मिळणार आहेत. आम्ही ज्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्याची किंमत 388 रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनबद्दल सविस्तर माहिती-

Reliance Jio cheapest plan
Reliance Jio cheapest plan

Reliance Jioचा 388 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio च्या या प्लॅनची ​​सेवा वैधता 28 दिवसांची आहे. या किंमतीत तुम्हाला दररोज 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळणार आहे, जो एकूण 56GB असेल. याशिवाय, कॉलिंगच्या बाबतीत तुम्हाला अमर्यादित लाभ आणि दररोज 100 SMS ची सुविधा देखील दिली जाईल.

त्याबरोबरच, Jio च्या या 388 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जसह पात्र ग्राहक अमर्यादित 5G डेटा देखील विनामूल्य वापरू शकतात. दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होईल. हे देखील लक्षात घ्या की, Jio Cinema Premium हे Jio Cinema च्या मोफत सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट केलेले नाही. यासाठी तुम्हाला स्वतंत्र रिचार्ज करावा लागणार आहे.

disney+ Hotstar offer on jio plan

एवढेच नाही तर, तर प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या एका महिन्याच्या रिचार्जमध्ये तुम्हाला संपूर्ण 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioCinema, JioTV आणि JioCloud सारख्या इतर Apps चाही मोफत ऍक्सेस मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo