Jio ने अलीकडेच आपल्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स महाग केले आहेत. यामुळे युजर्सना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता कंपनीने सध्याच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. कंपनीने आपल्या एका स्वस्त प्लॅनची वैधता वाढवली आहे. हा कंपनीचा लोकप्रिय प्लॅन आहे, या प्लॅनची किंमत 349 रुपये आहे.
रिलायन्स Jio चा 349 रुपयांचा प्लॅन पूर्वी जवळपास महिन्याभराच्या वैधतेसह म्हणजेच 28 दिवसांच्या वैधतेसह सादर केला जात होता. मात्र, आता कंपनीने त्यात उपलब्ध वैधता वाढवली आहे. होय, कंपनीने आपल्या X म्हणजेच Twitter पोस्टद्वारे या प्लॅनच्या अपडेटबद्दल माहिती दिली आहे. आता या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांव्यतिरिक्त 30 दिवसांची वैधता मिळेल. लक्षात घ्या की, सध्या हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर फक्त 28 दिवसांच्या वैधतेसह सूचीबद्ध आहे.
Jio या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे पूर्वीप्रमाणेच आहेत. वैधतेव्यतिरिक्त, या प्लॅनमधील फायदे अगदी समान ठेवलेले आहे. हा प्लॅन तुम्हाला दररोज 2GB डेटा ऑफर करतो. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. एवढेच नाही तर, तुम्हाला दररोज 100SMS चे बेनिफिट देखील मिळेल. वैधतेत वाढ झाल्यानंतर, या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा लाभ देखील वाढला आहे. यापूर्वी हा प्लॅन वापरकर्त्यांना केवळ 56GB डेटा देत होता. मात्र, आता या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 60GB डेटाची सुविधा मिळेल.
Jio च्या 349 रुपयांच्या प्लॅनची किंमत आधी 299 रुपये होती. मात्र, काही काळापूर्वी कंपनीने या प्लॅनची किंमत 349 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G इंटरनेट सुविधा देखील मिळेल.
Jio ने नुकतेच आपल्या प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये 3 नवीन प्लॅन्स समाविष्ट केले आहेत. Jio च्या नव्या प्लॅन्सची किंमत 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. डेटा, कॉलिंग सारख्या नेहमीच्या टेलिकॉम बेनिफिट्ससह तुम्हाला यात मनोरंजन देखील मिळेल. नव्या प्लॅन्समध्ये Disney+Hotstar, SonyLIV आणि ZEE5 सारख्या प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल.