Airtel आणि VI सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स Jio सतत नवनवीन प्लॅन्स घेऊन येत आहे. Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवे प्लॅन्स घेऊन येते. जिओकडे भरपूर डेटा आणि कॉलिंग सुविधांसह अनेक परवडणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. येथे आम्ही तुम्हाला 3 रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व प्लॅनमध्ये, तुम्हाला डेटा आणि कॉलिंग सुविधेसह 28 ते 30 दिवसांची वैधता मिळेल.
हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना अधिक डेटाची आवश्यकता असते. 299 रुपयांमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळेल. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 56GB डेटा मिळेल. इतर योजनांप्रमाणे, या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS सह Jio ऍप्स (JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud) चे फ्री ऍक्सेस मिळेल.
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Poco ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
Jio चा हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना डेली लिमिटशिवाय डेटा हवा असतो. 296 रुपयांमध्ये ग्राहकांना 30 दिवसांसाठी 25GB डेटा दिला जातो. या वैधतेदरम्यान हा डेटा कधीही वापरला जाऊ शकतो. यामध्ये देखील Jio ऍप्स (JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud) चे फ्री ऍक्सेस मिळेल. याव्यतिरिक्त, यात इतर प्लॅन्सप्रमाणेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा आहे.
रिलायन्स Jioचा हा प्लॅन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो, प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो, म्हणजे यामध्ये तुम्हाला एकूण 28GB डेटा मिळेल. हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSसह येतो. एवढेच नाही तर तुम्हाला या प्लॅनसह Jio ऍप्सचे (JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud) फ्री ऍक्सेस देखील मिळेल.