digit zero1 awards

OTT सब्स्क्रिप्शनसह JIO चे तीन Best प्लॅन्स, Unlimited 5G डेटासह Entertainment होणार जबरदस्त

OTT सब्स्क्रिप्शनसह JIO चे तीन Best प्लॅन्स, Unlimited 5G डेटासह Entertainment होणार जबरदस्त
HIGHLIGHTS

Jio चे जवळपास 44 कोटी वापरकर्ते आहेत.

हे प्लॅन्स प्रसिद्ध Sony LIV आणि Zee5 सारख्या OTT सबस्क्रिप्शनसह येतात.

एवढेच नाही, तर या प्लॅन्समध्ये तुम्हाला 5G डेटा देखील मिळेल.

रिलायन्स Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio चे जवळपास 44 कोटी युजर्स आहेत. या वापरकर्त्यांसाठी, कंपनी वेळोवेळी उत्तम प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. अलीकडे कंपनीने अनेक OTT सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स देखील ऑफर केलले आहेत. जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्ही नवीनतम चित्रपट आणि ड्रामा शोचा आनंद घेऊ शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Sony LIV आणि Zee5 सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या सबस्क्रिप्शनसाठी आता वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही.

jio recharge plans with netflix
jio recharge plans with ott

Jio चा 3,662 रुपयांचा प्लॅन

Jio चा 3,662 रुपयांचा प्लॅन दररोज 2.5GB डेटा ऑफर करतो, त्यानंतर तो 64 kbps अमर्यादित आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, अनलिमिटेड 5G डेटा, दररोज 100 SMS आणि 365 दिवसांची वैधता समाविष्ट आहे. याशिवाय Sony LIV आणि ZEE5 चे मोफत सबस्क्रिप्शन यामध्ये उपलब्ध आहे. JioTV, JioCinema आणि JioCloud यांचाही या प्लॅनमध्ये समावेश आहे.

Jio चा 3,226 रुपयांचा प्लॅन

Jio कडे 3,226 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे, जो दररोज 2GB डेटा ऑफर करतो. दैनिक डेटा मर्यादा संपल्यास स्पीड 64 kbps पर्यंत येते. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कोळींच, अमर्यादित 5G डेटा, दररोज 100 SMS आणि 365 दिवसांची वैधता मिळेल. हा प्लॅन Sony LIV सब्स्क्रिप्शनसह येईल आणि त्यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे ऍक्सेस देखील मिळेल.

Jio चा 3,225 रुपयांचा प्लॅन

Jio चा 3,225 रुपयांचा प्लॅन दररोज 2GB डेटा, 64 kbps वर अमर्यादित डेटा ऑफर करतो. यामध्ये अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि ZEE5 बेनिफिट्ससह 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. JioTV, JioCinema आणि JioCloud यांचाही या प्लॅनमध्ये समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo