दररोज भरपूर डेटा आणि इतर अप्रतिम बेनिफिट्ससह देशातील टेलिकॉम दिग्गज Reliance Jio आपले प्लॅन्स ऑफर करते. Jio कडे बजेट रेंज ते एक्सपेन्सिव्ह किमतीत सर्व कॅटेगरीजमध्ये बसणारे प्लॅन्स उपलब्ध आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला दररोज 2GB/2.5GB डेटासह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. केवळ डेटाच नाही तर तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि OTT सब्सक्रिप्शनचे लाभ देखील मिळतील. बघुयात यादी-
या प्लॅनमध्ये कंपनी 56 दिवसांच्या वैधतेसह बेनिफिट्स देते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा देत आहे. त्याबरोबरच, रिचार्जमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 100SMS आणि काही JIO Apps ची सुविधा दिली जात आहे.
हा प्लॅन 2GB डेटासह येणाऱ्या प्लॅन्सपैकी कंपनीचा दीर्घकालीन वैधता प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता जवळपास तीन महिने म्हणजेच एकूण 84 दिवसांची आहे. या अंतर्गत तुम्हाला एकूण 168GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह, दररोज 100SMS मिळतील. त्याबरोबरच, काही JIO Apps चे ऍक्सेस देखील मिळेल.
कंपनीने अलीकडेच Jio Swiggy One Lite प्लॅन 866 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS चा लाभ दिला जात आहे. याशिवाय, हा फोन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी Jio च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या रिचार्जमध्ये कंपनी Netflix मोबाईल सबस्क्रिप्शनसह 2GB दैनिक डेटा आणि 84 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल.
Jio च्या 2,999 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. परंतु, ऑफर अंतर्गत रिचार्जमध्ये 25 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील उपलब्ध आहे. इतर प्लॅन्सप्रमाणे, या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळतो. यासह तुम्हाला डेटा संपण्याची काळजी करण्याची गरज नाही.