रिलायन्स Jio कडून अनेक प्रकारचे वार्षिक रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. पूर्वी कंपनी 365 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन्स सादर करत होती. मात्र, आता काही रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह देखील वार्षिक रिचार्ज प्लॅनच्या नावाने ऑफर केले जातात. परंतु, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनबद्दलच माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये केवळ डेटा-कॉलिंगच नाही तर युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. बघुयात प्लॅन आणि अप्रतिम बेनिफिट्स पुढीलप्रमाणे-
हे सुद्धा वाचा: Good News! BSNL 4G सर्व्हिस ऑगस्ट 2024 मध्ये होणार लाईव्ह? Jio आणि Airtel ला बसेल का धक्का? Tech News
होय, आम्ही तुम्हाला रिलायन्स Jio च्या 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनबद्दल सांगणार आहोत. संपूर्ण वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनसह तुम्हाला सुमारे 230 रुपये मासिक खर्च येईल. या वार्षिक प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2.5GB डेटानुसार एकूण 912.5GB डेटा दिला जातो. मात्र जर तुमची दैनंदिन डेटा मर्यादा संपली असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. Jio मोफत पर्याय म्हणून अमर्यादित दैनिक डेटा ऑफर करत आहे.
एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याबरोबरच, या प्लॅनसह मोफत मेसेजिंगची सुविधाही मिळणार आहे. हा प्लॅन दररोज 100 फ्री SMS च्या सुविधेसह येतो. याव्यतिरिक्त, युजर्सच्या मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema इ. चे मोफत ऍक्सेस मिळणार आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Jio 336 दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन देखील ऑफर करते. Jio 2,545 रुपयांचा वार्षिक प्लॅन सादर करते, ज्याची वैधता एकूण 336 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटाचा लाभ मिळेल. यासह अमर्यादित डेटाचा लाभ देखील मिळेल, जेणेकरून तुम्ही विना अडथडा तुमची ऑनलाईन कामे करू शकता. याव्यतिरिक्त, यामध्ये मोफत कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा देखील उपलब्ध आहे.