देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स JIOने आपल्या दीर्घकालीन प्लॅनचा वापर करून ग्राहकांना फायदा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता 2,999 रुपयांच्या दीर्घकालीन प्रीपेड प्लॅनचा रिचार्ज करणार्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित 5G डेटा मिळेल. जिओच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : Aadhaar Card वापरून PAN मध्ये पत्ता अपडेट करा, बघा अगदी सोपा मार्ग…
Jio च्या मते, हा प्रीमियम प्रीपेड प्लॅन दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा म्हणजेच एकूण 912.5GB डेटा ऑफर करतो. 100SMS मिळतात. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. एवढेच नाही तर रिचार्ज प्लॅनसोबत जिओ टीव्ही, क्लाउड, सिक्युरिटी आणि सिनेमा यांसारख्या ऍप्समध्ये प्रवेश देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर हॅपी न्यू इयर ऑफर अजूनही दिली जात आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 75GB डेटा आणि 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल.
जिओच्या या हालचालीमुळे अनुक्रमे रु. 2,999 आणि रु 2,899 किंमत असलेल्या Airtel आणि Vodafone Idea च्या दीर्घकालीन प्लॅन्सना चांगलीच स्पर्धा मिळणार आहे.