digit zero1 awards

वर्षभराच्या वैधतेसह येतो JIO चा जबरदस्त प्लॅन, मिळतील सिक्योरिटी फायदे आणि बरेच काही…

वर्षभराच्या वैधतेसह येतो JIO चा जबरदस्त प्लॅन, मिळतील सिक्योरिटी फायदे आणि बरेच काही…
HIGHLIGHTS

JIO चा 2,879 रुपयांचा प्लॅन

वर्षभराच्या वैधतेसह दररोज मिळेल 2 GB डेटा

JioSecurity, JioTV, JioCinema इ. ऍप्सचे सब्स्क्रिप्शन उपलब्ध

कंपनीने रिलायन्स JIO च्या लेटेस्ट प्रीपेड प्लॅनमध्ये बरेच बदल केले आहेत. नवीन वर्षात काही प्लॅन्सच्या वैधतेचे दिवस वाढवण्यात आले आहेत, तर काहींच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी 365 दिवसांच्या वैधतेसह जिओचा अपडेटेड प्लॅन घेऊन आलो आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला सिक्योरिटी लाभ आणि बरेच बेनिफिट्स मिळतील. 

हे सुद्धा वाचा : चुटकीसरशी मिळेल तुमचा हरवलेला फोन, फक्त करा 'हे' काम

 JIO चा 2,879 रुपयांचा प्लॅन  

JIO च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन दररोज 2GB डेटासह येतो. वैधता संपेपर्यंत या किंमतीत तुम्हाला संपूर्ण 730GB डेटा मिळेल. यासोबतच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि SMS चे फायदेही मिळतात. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड फक्त 64 Kbps पर्यंत राहील. यामध्ये दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.

आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हॅकर्स तुमच्या फोनमधून पिन कोड, पासवर्ड, ईमेल इत्यादी संवेदनशील माहिती चोरू शकतात. हा प्लॅन तुम्हाला सुरक्षा फायदे देखील देतो. कारण तुम्हाला JioSecurity ऍपचे सबस्क्रिप्शन मिळते जे तुमच्या संवेदनशील डेटा जसे की फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, बँक अकाउंट नंबर, OTP इत्यादीची सुरक्षा सुनिश्चित करते. Jio प्लॅनसह येणारा JioCloud तुम्हाला अतिरिक्त स्टोरेजचा पर्याय देतो. 

तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकाला JioTV, JioCinema सारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. JioTV द्वारे तुम्ही 365 दिवस ऍपवर विविध प्रकारच्या टीव्ही शोचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला या पॅकसह JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल, जे प्लॅनच्या वैधतेपर्यंत वैध असेल. प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही Reliance Jio च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo