Jio चा धमाकेदार प्लॅन ! फक्त 219 रुपयांमध्ये मिळेल दररोज 3GB डेटा

Updated on 16-May-2023
HIGHLIGHTS

JIO Cinema वर IPL बघणे जरी मोफत असले तरीही युजर्सना अधिक डेटाची गरज तर आहे.

हा प्लॅन एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह येतो.

बघा 28 दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन

सध्या क्रिकेट सीझनमध्ये Jio च्या क्रिकेट प्लॅन्सना भरभरून मागणी आहे. ज्या प्लॅनला सर्वाधिक मागणी आहे, त्यात जिओच्या 219 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. JIO Cinema वर IPL बघणे जरी मोफत असले तरीही युजर्सना अधिक डेटाची गरज तर आहेचं. परंतु अधिक डेटा असलेल्या प्लॅन्स खूप महागडे आहेत, यात शंका नाही. अशात जिओकडून 219 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला जात आहे. ज्यामध्ये कमी किमतीत भरपूर डेटा मिळणार आहे. 

JIO चा 219 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 3GB डेटा मिळणार आहे. Jio वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 44GB डेटा मिळतो. विशेष लाभ म्हणजे या प्लॅनमध्ये 2GB अतिरिक्त डेटा देखील दिलेला आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील उपलब्ध आहे.

अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात Jio टीव्ही, Jio सिनेमा, Jio सिक्युरिटी आणि Jio क्लाउडची सुविधा देखील दिली जात आहे. या प्लॅनमध्ये Jio TV वरील चित्रपट आणि शो सोबत तुम्ही Jio सिनेमावरील IPL सामन्यांचा आनंद देखील घेऊ शकता. 

भरपूर डेटासह येणारे इतर प्लॅन्स

 तुम्ही 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलले तर, या प्लॅनची किमंत 399 रुपये आहे. या प्लॅनचा रिचार्ज केल्यास तुम्हाला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच यासह तुम्हाला एकूण 90GB डेटा मिळेल. तर वरील प्लॅनप्रमाणे, यामध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :