जबरदस्त ! 1 महिन्याच्या वैधतेसह Jio चा 200 रुपयांचा प्लॅन, डेटा आणि कॉलिंग फ्री, Airtel-Vi वर पडतोय भारी
Jio चा 200 रुपयांचा प्लॅन Airtel-Vi वर भारी
प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध
डेली डेटा, कॉलिंग, SMS सह अनेक सुविधा
रिलायन्स Jioचा एक स्वस्त प्लॅन बाकीच्या कंपन्यांवर भारी पडत आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत जवळपास 200 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 1 महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग दिले जाते. इतर कंपन्यांकडे असे प्लॅन्स जास्त किंमतीत आहेत. चला जाणून घेऊयात या विशेष प्लॅनबाबत सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : Amazon Prime Day Sale : iQOO Z6 5G, iQOO Neo 6 5G पासून 'या' फोनवर, तुम्हाला प्रचंड सूट मिळेल
Jio चा 209 रुपयांचा प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये सर्व सुविधा स्वस्त दरात मिळतात. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. यासह, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. तुमच्या मनोरंजनासाठी प्लॅनमध्ये Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.
Airtel चा 265 रुपयांचा प्लॅन
Airtel कडे अशा फीचर्ससह 265 रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅनची किंमत Jio पेक्षा 56 रुपये जास्त आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय मोफत HelloTunes आणि Wink Music वर फ्री ऍक्सेस दिला जातो.
Vi चा 265 रुपयांचा प्लॅन
त्याचप्रमाणे, Vodafone Idea चा देखील 269 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये 1 GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS 28 दिवसांसाठी दररोज उपलब्ध आहेत. यामध्ये Vi Movies & TV Basic चे सबस्क्रिप्शन दिले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile