डेली 1GB डेटासह Jio च्या सर्व प्लॅन्सची यादी, मिळेल Unlimited कॉलिंग आणि इतर अप्रतिम बेनिफिट्स। Tech News  

डेली 1GB डेटासह Jio च्या सर्व प्लॅन्सची यादी, मिळेल Unlimited कॉलिंग आणि इतर अप्रतिम बेनिफिट्स। Tech News  
HIGHLIGHTS

डेली 1GB डेटासह Jio च्या सर्व प्लॅन्सची माहिती

JIOच्या 1GB डेली डेटासह येणाऱ्या प्लॅन्सची सुरुवातीची ​​किंमत 149 रुपये

प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर अमर्यादित कॉलिंग आणि इतर सुविधा देखील मिळतील.

टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio ही सध्या भारतीय दूरसंचार कंपन्यांमधील एक अशी कंपनी आहे, जी वापरकर्त्यांच्या गरजेनुसार मोफत कॉलिंग आणि अधिक डेटासह प्लॅन्स ऑफर करते. कंपनीचा जवळपास प्रत्येक रिचार्ज पॅक अमर्यादित कॉल, डेटा आणि SMS बेनिफिट्ससह येतो. हे लक्षात घेऊन, आज आम्‍ही तुम्‍हाला डेली 1GB डेटासह Jio च्या सर्व प्लॅन्सची माहिती देणार आहोत. बघुयात यादी-

हे सुद्धा वाचा: नव्या अवतारात येणारा OnePlus 11R 5G मोठ्या Discountसह उपलब्ध, Amazon Saleमधून खरेदी करा

JIOचा 149 रुपयांचा प्लॅन

JIOच्या 1GB डेली डेटासह येणाऱ्या प्लॅन्सची सुरुवातीची ​​किंमत 149 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 20 दिवसांसाठी दररोज एकूण 1GB इंटरनेट डेटा मिळेल. प्लॅनसह, जिओ कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील देत आहे.

Jio New Prepaid Plans with unlimited 5G and cricket offer
Jio New Prepaid Plans with unlimited 5G and cricket offer

JIOचा 179 रुपयांचा प्लॅन

JIO च्या 1GB दैनंदिन डेटा प्लॅनसाठी दुसरा पर्याय म्हणजे 179 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता मिळेल. युजर्सना या प्लॅनसह दररोज 1GB डेटाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला वैधतेदरम्यान 24GB 4G डेटा मिळेल. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जात आहेत. यासह तुम्हाला Jio App चे मोफत ऍक्सेस देखील मिळेल.

JIO चा 209 रुपयांचा प्लॅन

Jio चा 209 रुपयांचा प्लॅन मासिक रिचार्जसाठी आहे, अप्रतिम ठरेल. ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 28GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच तुम्हाला दररोज 1GB डेटा वापरता येणार आहे. यासोबतच, संपूर्ण देशभरात नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 100SMS देखील दिले जातील.

अधिक डेटासह समान किंमत श्रेणीमध्ये येणारा प्लॅन

JIO चा 199 रुपयांचा प्लॅन:

जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1.5GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ​एकूण 23 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्रकरणात, तुम्हाला एकूण 34.5GB डेटा मिळेल. एवढेच नाही तर, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येईल. त्याबरोबरच, तुम्हाला दररोज 100SMS देखील दिले जातील. याशिवाय कंपनी Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo