दरवाढीनंतर रिलायन्स Jio कडून अनेक दीर्घकालीन प्लॅन्स ऑफर केले जात आहेत. जर तुम्ही नवीन दीर्घकाळ वैधतेसह परवडणार प्लॅन शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. विशेष म्हणजे हा रिचार्ज प्लॅन फक्त My Jio ॲपद्वारेच रिचार्जसाठी उपलब्ध असेल. Jio च्या या प्लॅनची किंमत 1,899 रुपये इतकी आहे. तर, तुम्हाला हा प्लॅन जवळपास वर्षभराच्या वैधतेसह मिळेल. जाणून घेऊयात बेनिफिट्स-
Also Read: महागडे रिचार्ज नको? जाणून घ्या BSNL वर सिम पोर्ट करण्याची पद्धत, स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
Jio चा 1,899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह येणारा स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता एकूण 336 दिवसांची आहे. किंमत आणि वैधता बघितल्यास तुम्हाला या प्लॅन्समधील बेनिफिट्ससाठी दररोज फक्त 5 रुपयांचा खर्च येणार आहे. यमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि SMS सुविधा मिळतात. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी खूप चांगला पर्याय ठरतो, जे चांगल्या दीर्घकाळासाठी एक उत्तम प्लॅन शोधत आहेत.
Jio चा 1,899 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात संपूर्ण वैधतेदरम्यान 24GB डेटा मिळणार आहे. तसेच, यात देशातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये 336 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
या प्लॅनची सरासरी किंमत मोजली तर, दररोज केवळ 5 रुपयांचा खर्च आहे. जरी या प्लॅनची वैधता वर्षभरापेक्षा कमी असेल तरी, कंपनी वार्षिक प्लॅनच्या नावाने या प्लॅनची विक्री करते. मात्र, याआधी हा प्लॅन खूपच स्वस्त होता. याआधी या प्लॅनसाठी तुम्हाला केवळ 1,599 रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, 3 जुलैपासून किंमत वाढल्यानंतर हा प्लॅनही महाग झाला आहे. आता या प्लॅनसाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल.