JIO च्या ग्राहकांसाठी दीर्घकाळ वैधतेसह सर्वात स्वस्त प्लॅनची सोय करण्यात आली आहे. या लेखात आम्ही अशाच एका स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत. JIO चा 1559 रुपयांचा प्लॅन Jio च्या अधिकृत साइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये सूचीबद्ध आहे. या प्लॅनमधील सविस्तर फायदे बघुयात-
JIO कडे 1559 रुपयांचा प्लॅन आहे, जो नक्कीच 336 दिवसांच्या दीर्घकाळ वैधतेसह येतो. मात्र, एक लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये फक्त 24 GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल. तसेच या प्लॅनसह तुम्हाला लोकल आणि STD अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळणार आहे.
त्याबरोबरच, म्हणजे डेटा आणि कॉलिंगसह तुम्हाला SMS लाभ देखील मिळतोय. तुम्हाला या प्लॅनसह 3600 SMS मिळणार आहेत. जर तुम्ही 5G पात्र ग्राहक असाल तर प्लॅनमध्ये तुम्हाला 5G नेटवर्क आणि डेटा स्पीडचा आनंद देखील घेता येईल.
इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला Jio TV, Jio Security, Jio Cloud आणि Jio Cinema सारख्या ऍप्समध्ये प्रवेश मिळणार आहे. यासाठी Reliance Jio त्याच्या वापरकर्त्यांकडून वेगळे काहीही शुल्क घेणार नाही.