JIO आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन प्लॅन्स आणत आहे. आता कंपनीचा एक प्लॅन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. जर तुम्हालाही हा प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर आधी तुम्हाला त्याचे फायदे माहिती असायला हवेत. Jioच्या 152 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे प्लॅन खास बनते.
या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 14GB डेटा देण्यात आला आहे. तुम्हाला दररोज 0.5GB डेटा दिला जातो. तसेच, हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगची सुविधा देतो. SMS बद्दल बोलायचे झाले तरयात दररोज 300 SMS दिले जातात. मात्र, यात एक गोष्ट लक्षात घ्या की, हे प्लॅन फक्त JIO फोन वापरकर्त्यांना मिळत आहे.
सबस्क्रिप्शनच्या बाबतीतही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला या सर्व गोष्टींचा आनंद फक्त जिओ फोनमध्येच घेऊ शकता.
JIOचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
JIO च्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. या दरम्यान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबतच तुम्हाला या कालावधीत 50 SMS देखील मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 MB हाय स्पीड डेटा मिळतो. युजर्ससाठी कमी किमतीत हा एक सर्वोत्तम प्लॅन आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.