सिनेरसिकांसाठी OTT कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन सुविधा देखील जोडत असतात. JIO ने अलीकडेच एक खास प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये डेटा आणि कॉलिंगसह तब्बल 14 OTT ऍप्सचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. JIO चा हा प्लॅन 1,499 रुपये किमतीचा आहे. बघुयात बेनिफिट्स –
JIO चा 1499 रुपयांचा प्लॅन हा एक JIO Fiber प्लॅन आहे. हा प्लॅन एकूण 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या वैधतेदरम्यान प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच अनलिमिटेड डेटा सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 300mbps अपलोड आणि 300mbps डाऊनलोडिंग स्पीडची सुविधा मिळणार आहे.
विशेषतः या प्लॅनमध्ये 14 पेक्षा जास्त फ्री OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. त्यामध्ये, Netflix Basic, Prime Video, Disney+ Hotstar, Voot Select, Sony Liv, ZEE5, Voot Kids, Sun NXT, Hoichoi, Universal +, Lionsgate Play, Discovery+, JioCinema, ShemarooMe, Eros Now, ALTBalaji आणि JioSaavn या ऍप्सचा समावेश आहे.
तर मथळ्याप्रमाणे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या प्लॅनसह बचत कशी होणार ? तर तुम्हाला माहितीच असेल की, Amazon Prime Video च्या वार्षिक सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. Netflix चा बेसिक प्लॅन 199 रुपयांमध्ये येतो. तर, Disney+ Hotstar चे सब्स्क्रिप्शन 299 रुपयांपासून सुरु होते. असे सर्व मुख्य OTT प्लॅटफॉर्म्स तुम्हाला या प्लॅनमध्ये मोफत मिळणार आहेत. त्यामुळे हे सर्व सब्स्क्रिप्शन घेण्याचा खर्च तुम्हाला हा प्लॅन घेतल्यास लागणार नाही. त्यामुळे यासह तुमची मोठी बचत होणार आहे.