Jio ने वाढवले ​​Airtel-VI चे टेन्शन! फक्त 148 रुपयांमध्ये संपूर्ण महिन्यासाठी तब्बल 12 OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News 

Jio ने वाढवले ​​Airtel-VI चे टेन्शन! फक्त 148 रुपयांमध्ये संपूर्ण महिन्यासाठी तब्बल 12 OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Jioच्या 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतील तब्बल 12 OTT सबस्क्रिप्शन

केवळ OTT बेनिफिट्सच नाही तर तुम्हाला भरपूर डेटा देखील मिळेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे.

Jio आपल्या युजर्ससाठी सतत आपल्या प्लॅन्समध्ये बदल करत असते. जर तुम्ही नवीन प्लॅन शोधत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी ज्यांना कमी खर्चात OTT सबस्क्रिप्शन आणि डेटा लाभ हवा आहे. या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला 148 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. लक्षात घ्या की, जिओच्या या प्लॅनचा सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या यादीत समावेश आहे.

Jio चा 148 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक नवीन सुविधा दिल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान मर्यादेशिवाय डेटा देखील दिला जात आहे. होय, हा प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला संपूर्ण 10GB डेटा मिळणार आहे. यासह तुम्हाला तुम्ही हाय इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.

JIO OTT PLANS

महत्त्वाच्या मुद्द्यावर येत, Jio च्या या प्लॅनमध्ये SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi आणि Chaupal सोबत DocuBay, EPIC ON आणि Hoichoi चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. हे सर्व सब्स्क्रिप्शन तुम्ही या प्लॅनच्या संपूर्ण वैधतेदरम्यान वापरू शकता.

हा प्लॅन तुम्ही My Jio ऍपच्या मदतीने ऍक्टिव्ह करू शकता. My Jio ऍपद्वारे रिचार्ज केल्यास तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, इतर अनेक प्लॅटफॉर्मने यावर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकरीत साईट किंवा Appद्वारे रिचार्ज करणे, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. OTT सब्स्क्रिप्शनसह Jio कडे इतरही अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. जे तुम्ही App वर तपासून खरेदी करू शकता.

VI चा नवीन OTT प्लॅन

Vodafone Idea ने नुकतेच प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक लॉन्ग टर्म प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजनाचे उत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत 3,199 रुपये आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, VI ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे, जी 3,199 रुपयांच्या सर्वात कमी दर श्रेणीतील ऍन्युअल प्लॅनमध्ये सर्वाधिक लाभ देत आहे.

Jio Vs Vi (Vodafone Idea) Plans [Hindi - हिन्दी]
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo