रिलायन्स Jio आपल्या पोर्टफोलीओमध्ये अनेक प्लॅन्स ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला 123 रुपयांच्या किफायशीर प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये कंपनीने प्रचंड फायदे समाविष्ट केले आहेत. ज्यांना संपूर्ण महिन्यासाठी अमर्यादित कॉलिंग आणि इंटरनेट डेटा अतिशय कमी किमतीत खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी प्लॅन सर्वोत्तम ठरेल. अलीकडे, Reliance Jio ने नवीनतम JioBharat फीचर फोन सादर केला आहे, हा नवीन प्लॅन या फोनवर वापरला जाऊ शकतो.
रिलायन्स जिओकडून हा बजेट फ्रेंडली प्रीपेड प्लॅन ग्राहकांना ऑफर केला जात आहे. रिलायन्स जिओचा हा प्लॅन JioBharat फोनच्या वापरकर्त्यांसाठी पूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. त्याबरोबरच, रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14GB हायस्पीड 4G इंटरनेट दिले जात आहे.
जर तुम्ही Reliance Jio Phone वापरकर्ते असाल आणि तुम्हाला कमी किमतीत उत्तम फायदे देणारा प्लान शोधत असाल, तर तुम्ही रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅन देखील खरेदी करू शकता जो 91 रुपयांच्या किंमतीत येतो. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळेल ते जाणून घ्या.
रिलायन्स जिओने ऑफर केलेला हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना एकूण 3GB डेटा मिळतो. सविस्तर बोलायचे झाले तर, 100 MB + 200 MB अतिरिक्त डेटा प्रतिदिन दिला जात आहे. या परवडणाऱ्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 50SMS चाही लाभ मिळतो. विशेष म्हणजे या प्लॅनसह ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioCloud वर मोफत प्रवेश देखील मिळतो.
मधल्या काळात Jio चा 1,599 रुपयांचा प्लॅन बंद झाला, अशी बातमी आली होती. मात्र, हा प्लॅन अजूनही अस्तित्वात आहे, अशी माहिती मिळाली आहे. लक्षात घ्या की, हा रिचार्ज ऍन्युअल प्लॅन्स सेक्शनमध्ये उपलब्ध नाही. हा प्लॅन अजूनही जिओच्या साइट आणि व्हॅल्यू सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio चा 1559 रुपयांचा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजर्सना मोफत कॉलिंग हा प्लॅन वापरकर्त्यांना 24GB डेटाचा ऍक्सेस देतो. तर, यामध्ये 3600 SMS देखील मोफत दिले जातात. Jio चा हा प्लॅन Jio TV आणि JioCinema सबस्क्रिप्शनसह येतो. तसेच, पात्र ग्राहकांना यासह अमर्यादित 5G डेटा देखील मोफत मिळेल.