119 रुपयांमध्ये दररोज मिळतोय 1.5GB डेटा, कोणती कंपनी देतेय भारी ऑफर ?

119 रुपयांमध्ये दररोज मिळतोय 1.5GB डेटा, कोणती कंपनी देतेय भारी ऑफर ?
HIGHLIGHTS

JIO चा 119 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये दररोज 1.5GB हायस्पीड डेटा दिला जाणार आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला 14 दिवसांची वैधता देईल.

JIO कडे ग्राहकांसाठी अतिशय स्वस्त आणि मस्त प्लॅन आहे. आज आम्ही तुम्हाला 119 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात अप्रतिम बेनिफिट्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की, JIO च्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते कोणते लाभ किती दिवसांच्या वैधतेसह मिळणार आहेत. 

JIO चा 119 रुपयांचा प्लॅन 

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB हायस्पीड डेटा दिला जाणार आहे. पण, जर एकदा तुमची दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुमच्या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा हाय स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. डेटाशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित STD आणि मोफत लोकल कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्याबरोबरच, 300 SMS देखील दिले जातात. 

याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये तुम्हाला 14 दिवसांची वैधता देईल. तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 21GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळणार आहे. प्लॅनमधील उपलब्ध इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्रीपेड प्लॅन तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security सारख्या Jio ऍप्सवर मोफत प्रवेश यासारखे अनेक अतिरिक्त लाभ मिळणार आहेत.

या प्लॅनसारखा Airtelकडे 155 रुपयांच्या प्लॅन आहे, जो दररोज फक्त 1GB डेटा देतो. मात्र, यात तुम्हाला जास्त दिवसांची वैधता मिळणार आहे. म्हणजेच AIRTEL च्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo