रिलायन्स Jio ही देशातील आघाडीची टेलिकॉम दिग्गज आहे. आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी नवीन प्रीपेड प्लॅन्स सादर करत असते. तसेच, कंपनी आपले जुने प्लॅन्स देखील अपग्रेड करत असते. त्यामुळेच, दरवाढीनंतरही Jio प्लॅन्स आपल्या अप्रतिम बेनिफिट्ससाठी ओळखले जातात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दीर्घकालीन वैधता आणि भरपूर डेटा दिला जातो. जाणून घेऊयात या Jio प्लॅनबद्दल सविस्तर माहिती-
आम्ही तुम्हाला Jio च्या 1049 रुपयांचा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, हा प्लॅन खूप विशेष आहे. या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. म्हणजेच हा प्लॅन रिचार्ज केल्याने तुम्हाला दर महिन्याला प्लॅन रिचार्ज करण्यापासून सुटका मिळेल. तुम्ही या प्लॅनचा लाभ दीर्घकाळापर्यंत सतत घेता येईल.
प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, इंटरनेट वापरण्यासाठी या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या प्लॅनसह एकूण 168GB डेटा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 5G अमर्यादित डेटा देखील कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असेल.
हा प्लॅन आता अपग्रेड करण्यात आला आहे. होय, या रिचार्ज प्लॅनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मनोरंजनासाठी Zee5 आणि SonyLiv चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. या प्लॅनमध्ये JioCinema, TV आणि Cloud चे सबस्क्रिप्शनही 3 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.
Jio ने सप्टेंबरच्या अखेरीस 999 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 98 दिवसांची वैधता दिली जाईल. त्याबरोरबच, दररोज 2GB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, यात अमर्यादित कॉलिंग, Jio Cloud, Jio Cinema आणि JioTV सूट सारखे बेनिफिट्सदेखील मिळतील. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.