आयडिया सेल्युलर 4G सेवा भारतात लाँच
आयडिया सेल्युलरद्वारा दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ही सेवा सध्यातरी काही शहरांकरिताच मर्यादित आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा च्या सर्व शहरांमध्ये 4G सेवा मार्च २०१६ पर्यंत उपलब्ध होईल.
टेलिकॉम कंपनी आयडिया सेल्युलरने भारतात आपली 4G सेवा सादर केली आहे. सध्यातरी कंपनीने आपली 4G सेवा केवळ दक्षिण भारताच्या काही शहरांमध्ये लाँच केली आहे.
आयडिया सेल्युलरद्वारा मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा सध्यातरी काही शहरांपुरता मर्यादित आहे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा च्या सर्व शहरांमध्ये 4G सेवा मार्च २०१६ पर्यंत उपलब्ध होईल.
एअरटेल भारतात 4G मोबाईल नेटवर्क लाँच करणारी पहिली कंपनी आहे. एयरटेल ऑगस्ट महिन्यात देशभरात २९६ शहरांमध्ये वाणिज्यिकरित्या 4G सेवा सुरु केली होती.
त्याशिवाय वोडाफोनने 14 डिसेंबरला भारतात 4G सेवा क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ह्याची सुरुवात कोच्चीपासून केली. वोडाफोन इंडिया ही सेवा त्वरित त्रिवेंद्रम आणि कालीकटमध्ये सुरु करेल. तर मुंबई, दिल्ली, बंगळूरू आणि कोलकातामध्ये ही सेवा पुढील वर्षी मार्च महिन्यापासून सुरु होईल.
रिलायन्स जियोने आतापर्यंत आपली 4G सेवेची रोलआऊटच्या तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile