आयडिया सेलुलर ने आपला नवीन Rs 998 च्या किंमतीत येणारा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉल्स सह 100 SMS आणि 5GB 4G/2G डेटा रोज या हिशोबाने सर्व 35 दिवसांसाठी देण्यात येत आहे. हा प्लान एयरटेल आणि रिलायंस जियो च्या Rs 799 मध्ये येणार्या प्लांस ला मोठी टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की या प्लान मध्ये तुम्हाला फक्त एवढंच मिळत आहे, असे नाही. या प्लान मध्ये तुम्हाला आयडिया मॅजिक ऑफर पण मिळत आहे, जी आयडिया प्रीपेड ग्राहकांना आयडिया अॅप आणि वेबसाइट च्या माध्यमातून रिचार्ज केल्यास Rs 3,300 चा कॅशबॅक पण ऑफर करत आहे.
Rs 998 मध्ये सादर करण्यात आलेल्या या प्लान च्या एका दुसर्या खासियत बद्दल बोलायचे झाले तर या मधून तुम्ही आठवड्यात जवळपास 100 यूनिक नंबर्स वर काही लिमिट सह कॉल करू शकता. जी जवळपास 1000 मिनट प्रति सप्ताह या नुसार मिळेल, यासोबत यात 250 मिनट प्रतिदिन ची लिमिट पण तुम्हाला मिळत आहे. जर तुम्ही ही लिमिट पार केलीत तर तुम्हाला Re 1 पैसा प्रति सेकंड या दराने लोकल आणि STD कॉल्स साठी चार्ज केले जाईल.
हा पॅक खासकरून ओरीसा साठी काही सर्किल्स मध्ये आता उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला काही अशाच सुविधा काही कमी म्हणजेच 28 दिवसांसाठी कर्नाटका मध्ये पण मिळत आहेत. पण इथे तुम्हाला आयडिया मॅजिक कॅशबॅक ऑफर पण मिळत नाही.
पण आयडिया च्या या पॅक बद्दल बोलायचे झाले तर हा खर्या अर्थाने हा धमाकेदार आहे असे आपण बोलू शकतो कारण आयडिया चा Rs 998 च्या पॅक मध्ये जो तुम्हाला जास्त दिवसांसाठी मिळत आहे, तसेच काहीसे फायदे तुम्हाला जियो च्या Rs 799 वाल्या पॅक मध्ये फक्त 28 दिवसांसाठी मिळत आहेत . याव्यतिरिक्त एयरटेल बद्दल बोलायचे झाले तर कंपनी कडे पण 28 दिवसांची वैधता असलेला एक प्लान आहे जो Rs 799 च्या किंमतीत येतो. या प्लान मध्ये तुम्हाला रोज 3.GB 4G डेटा मिळत आहे. बाकी सर्व सामान सेवा या पॅक मध्ये पण मिळत आहेत.
आयडिया यावरच थांबली नाही, कंपनी ने आपल्या या प्लान सोबत अजुन एक प्लान लॉन्च केला आहे, जो Rs 1,298 च्या किंमतीत येतो, आणि यात तुम्हाला 35 दिवसांसाठी रोजच्या हिशोबाने 7GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या पॅक मध्ये पण अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि 100 SMS मिळत आहेत. सोबतच हाही आयडिया मॅजिक कॅशबॅक ऑफर सह येत आहे.