आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट
नवीन पॅक्सविषयी बोलायचे झाले तर, 1GB पेक्षा कमी पॅक्सवर आयडिया ४५ टक्क्यांचा फायदा देत आहे. त्याचबरोबर आयडियाचे 4G, 3G आणि 2G छोटे पॅक आता ८ रुपये आणि २२५ रुपयात मिळतील.
आपल्या सर्वांना माहितच असेल की, पुढील महिन्यापासून रिलायन्स आपली 4G सेवा संपुर्ण भारतात लाँच करणार आहे. हीच गोष्ट समोर ठेवून आता सर्व टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त यूजर्सला आपल्याकडे खेचून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आयडिया आणि एअरटेल त्याचेच एक उदाहरण आहे. ह्या दोन्ही कंपन्यांनी आपल्या मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप घट केली आहे.
मागच्या शुक्रवारी म्हणजेच १५ जुलैला आयडिया सेल्युलर ने आपल्या मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट केली आहे आणि आता नवीन ऑफर आयडियाच्या 4G, 3G आणि 2G पॅक्सवर मिळत आहे. कंपनीने आपले हे नवीन दर शुक्रवारपासून भारतात लागू केले आहेत.
कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी शशिशंकरने असे सांगितले आहे की, “सर्वांनाच इंटनेटचा फायदा व्हावा हाच आमचा प्रमुख उद्देश आहे आणि आमच्या ह्या पावलानंतर आपल्याला इंटरनेट कमी किंमतीत मिळेल.”
हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स…
ह्या नवीन पॅक्सविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1GB पेक्षा कमी पॅक्सवर आयडिया ४५ टक्क्यांचा फायदा देत आहे. त्याचबरोबर आयडियाचे 4G, 3G आणि 2G छोटे पॅक आता ८ रुपये आणि २२५ रुपयात मिळतील.
त्याचबरोबर कंपनी आपल्या १९ रुपयाच्या पॅकमध्ये 2G पॅक डाटा ज्यावर 75MB डाटा तीन दिवसांसाठी मिळत होता. आता आपल्याला ह्यात 110MB डाटा मिळत आहे. त्याशिवाय २२ रुपयाच्या पॅकमध्ये आपल्याला केवळ 64MB 4G/3G डाटा मिळत होता. हा तीन दिवसांसाठी आता 90MB चा 3G डाटा केला आहे.
हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा
हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile