रिलायन्स जिओ ऑगस्टमध्ये आपली 4G सेवा भारतात लाँच करणार आहे आणि त्याला पाहता इतर सर्व इंटरनेट सेवा प्रदाते कंपन्या हडबडून गेल्या आहेत. सर्वात आधी आयडियाने मग एअरटेलने आणि आता पुन्हा एकदा आयडिया सेल्युलरने आपल्या मोबाईल डाटा च्या किंमतीत घट केली आहे.
ह्यावेळी आयडियाने एअरटेलच्या रेट्सला मॅच करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट केली आहे. ह्याआधी एअरटेलने आपल्या मोबाईल डाटाच्या किंमतीत जवळपास ६७ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. आणि आता आयडियाने ह्याच क्लबला जॉईन केले आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] Coolpad Max Unboxing – कूलपॅड मॅक्स अनबॉक्सिंग
आता आयडिया सेल्युलरने सुद्धा आपल्या 4G, 3G मोठ्या इंटरनेट पॅक्सच्या संख्येत ६७ टक्क्यांची घट केली आहे. त्याचबरोबर ह्यात जे यूजर्स 2GB ते 10GB पर्यंतचा डाटा वापरतात त्यांच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी देणार असल्याचेही सांगितले आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्याआधीही आयडियाने आपल्या मोबाईल डाटा रेट्समध्ये ४५ टक्क्यांची घट केली होती आणि त्यानंतर एअरटेलने ६७ टक्के घट केली होती. त्यामुळे आयडिया पुन्हा एकदा आपल्या मोबाइल डाटा रेट्समध्ये ६७ टक्क्यांची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा – एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?