आयडिया ने सादर केला Rs. 109 किंमतीचा नवीन

आयडिया ने सादर केला Rs. 109 किंमतीचा नवीन
HIGHLIGHTS

या प्लान अंतर्गत रोज फक्त 250 मिनिट आणि आठवड्यातून फक्त 1000 मिनिट कॉलिंग केली जाऊ शकते.

आयडिया ने आता बाजारात आपला एक प्लान सादर केला आहे. या नव्या प्लानची किंमत Rs. 109 ठेवण्यात आली आहे. हा एक 'अनलिमिटेड कॉल्स' प्लान आहे. याची वैधता 14 दिवस आहे. अजूनतरी हा प्लान फक्त काही सर्कल्स मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

आयडिया च्या Rs. 109 किंमतीच्या प्लान मध्ये 'अनलिमिटेड' लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स ची सुविधा मिळते. यासोबतच या प्लान मध्ये यूजरला 1GB 4G/3G डाटा पण मिळतो. हा प्लान रोज 100 लोकल आणि नॅशनल SMS ची सुविधा पण देतो. पण या प्लान अंतर्गत रोज फक्त 250 मिनिट आणि आठवड्यातून फक्त 1000 मिनिटच कॉलिंग केली जाऊ शकते. 
आयडिया ने कही दिवसांपूर्वी Rs. 93 किंमतीचा प्लान सादर केला होता. या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉइस कालिंग सह 1GB डाटा दिला जातो जो 10 दिवसांच्या वैधते सह येतो. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo