AIRTEL : तातडीने काम पूर्ण करायचंय आणि डेटा संपला ? ‘अशा’ प्रकारे 4G डेटा लोन घ्या, पहा स्टेप्स

Updated on 28-Aug-2022
HIGHLIGHTS

AIRTEL कडून डेटा लोनची सुविधा सुरु

आपत्कालीन परिस्थितीत पडेल उपयोगी

डेटा लोन घेण्यासाठी अगदी सोप्या स्टेप्स बघा

जर तुम्ही महत्त्वाचे काम करत असाल आणि अचानक डेटा संपला तर तुमच्याकडे लगेच रिचार्ज करण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही डेटा लोन देखील घेऊ शकता? खरंच ! AIRTEL ही सुविधा आपल्या यूजर्सना देत आहे. होय, तुम्ही Airtel कडून 4G, 3G किंवा 2G डेटा लोन मिळवू शकता, परंतु तुम्हाला ही पद्धत माहित असणे आवश्यक आहे.  जी कदाचित क्वचितच लोकांना माहित असेल. जर तुम्हाला AIRTEL कडून डेटा लोन घ्यायचे असेल तर वाचा सविस्तर… 

हे सुद्धा वाचा : OnePlus ने लाँच केले नवीन वायर्ड इयरफोन्स, जबरदस्त फीचर्ससह किंमतही कमी

AIRTEL डेटा लोन म्हणजे काय?

जेव्हा तुमचा AIRTEL डेटा बॅलन्स संपतो आणि तुम्हाला तातडीने इंटरनेट सर्फ करण्याची किंवा काही काम पूर्ण करण्याची आवश्यकता असते, तेव्हा AIRTEL तुम्हाला इतर कर्जांप्रमाणेच झटपट डेटा ऑफर करते. हे लक्षात घ्यावे की, हा डेटा केवळ निवडलेल्या कालावधीसाठी वैध आहे आणि कंपनी या सेवेसाठी तुमच्याकडून शुल्क देखील आकारते.

AIRTEL डेटा लोन मिळवण्याचा सोपा मार्ग :

> तुमच्या फोनवरील डायलरवर जा.

> आता *141*567# डायल करा आणि प्रतीक्षा करा.

> आता Airtel तुम्हाला नेटवर्क पर्यायांची सूची देऊन प्रतिसाद देईल.

> तुम्हाला सर्वात योग्य असे नेटवर्क निवडा, 2G, 3G किंवा 4G.

> याशिवाय तुम्ही AIRTEL लोन नंबर 52141 वर कॉल करून डेटा लोन मिळवू शकता.

जर तुम्ही देखील AIRTELचे ग्राहक असाल, तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्जावरील टॉकटाइम/डेटा मिळविण्यासाठी, वापरकर्ता वर नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतो किंवा फोन डायलर ऍपवरून संबंधित USSD कोड डायल करू शकतो. तुम्ही Airtel Thanks मोबाइल ऍप वापरूनही हे करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा की, असे कोणतेही कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला सिम रिचार्ज करणे आवश्यक आहे, ज्यावर ऑपरेटर सेवा शुल्क आकारेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :