JIO कडे अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. पोस्टपेड प्लॅन्समध्ये कंपनीने अलीकडे बरेच बदल केले आहेत. यामध्ये 199 रुपयांपासून सुरु होणाऱ्या मंथली सब्सक्रिप्शन दिला आत आहे. त्याबरोबरच, पोस्टपेड प्लॅनमध्ये इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी, प्रीमियम पोस्टपेड अनुभव, फॅमिली प्लॅन आणि OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन देखील मिळतात. या सर्व सुविधांसाठी तुम्हाला तुमची सिम पोस्टपेड मध्ये स्विच करायची असेल, तर पुढील प्रक्रिया बघा-
JIO Postpaid Plus Plans ची किंमत 199 रुपयांपासून सुरु होते आणि 1,499 रुपये प्रतिमहिना जाते. पोस्टपेड यूजर्सना महिना संपल्यावर बिल दिले जाते.
– JIO Postpaid Plus वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे नाव आणि प्रीपेड नंबर भरावे लागेल.
– त्यानंतर, जनरेट OTP वर क्लिक करा. OTP आल्यास ते भरून घ्या.
– आता तुमच्या JIO Postpaid Plus सिमसाठी डिलेव्हरी पत्ता द्या, आता 'Submit new jio SIM request' वर क्लिकर करा.
– यानंतर, तीन ते चार दिवसांत तुम्हाला JIO च्या प्रतिनिधीचा फोन येणार, घरीच KYC केली जाईल.
– यामध्ये Proof of Identity(POI) आणि Proof of adress (POA) वेरिफिकेशन्स केले जाईल.
– यानंतर, काही दिवसांत तुमची नवी सिम तुमच्याकडे पाठविली जाईल आणि एका दिवसाच्या आत सक्रिय केली जाईल.
– जिओकडून या प्रक्रियेसाठी 250 रुपयांचे सिक्योरिटी डिपोझिट घेतले जाईल. त्यासोबतच, 99 रुपये JIO प्राईमसाठी चार्ज केले जातील.