Jio, Vodafone Idea आणि Airtel सारख्या मोठ्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केली.
रिचार्ज दरवाढीनंतर अनेक ग्राहक विद्यमान सिम BSNL वर पोर्ट करत आहेत.
तुमचे विद्यमान सिम BSNL मध्ये कसे पोर्ट करायचे? जाणून घ्या प्रक्रिया
भारतात अलीकडेच तिन्ही खाजगी दूरसंचार कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. खरं तर, सर्वसामान्यांच्या खिशाला या दरवाढीमुळे चांगलाच ताण आला आहे. त्यामुळे, अनेक वापरकर्ते अलीकडील दर बदलांनंतर त्यांच्या विद्यमान दूरसंचार ऑपरेटरमधून सरकारी दूरसंचार कंपनी BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडवर स्विच करण्याचा विचार करत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio, Vodafone Idea आणि Airtel सारख्या मोठ्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किंमती सरासरी 15% वाढवली आहे. याशिवाय, या ऑपरेटर्सच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये सुमारे 500 ते 600 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या परिस्थितीचा लाभ घेत, BSNL देखील आपल्या रिचार्ज प्लॅन्सचा सक्रियपणे प्रचार करत आहे. BSNL त्याच्या 2G/3G नेटवर्कवर काम करत असून सध्या कंपनीच्या 4G सेवा देखील देशातील निवडक भागात उपलब्ध आहेत. तसेच पुढील महिन्यात BSNL देशभरात 4G सेवा सुरू करणार, असे देखील मानले जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता तुमचे विद्यमान सिम BSNL वर पोर्ट करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात-
विद्यमान सिम BSNL मध्ये कसे पोर्ट करायचे?
कोणताही नंबर पोर्ट करण्यासाठी, एक युनिक पोर्टिंग कोड (UPC) आवश्यक आहे. या कोडसाठी मेसेजमध्ये PORT लिहा आणि स्पेस दिल्यानंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाइप करा. हा मॅसेज 1900 वर मेसेज पाठवा.
यानंतर तुम्हाला UPC मिळेल. UPC ची वैधता 15 दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच तुम्हाला कोड प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत नंबर पोर्ट करण्याचे काम पूर्ण करावे लागेल.
कोड मिळाल्यानंतर, तुम्हाला कोणत्याही सिमकार्डच्या दुकानात किंवा BSNL च्या ग्राहक सेवा केंद्रात जावे लागेल.
तिथे तुम्हाला फोटो, आधार कार्ड आणि पर्यायी मोबाईल क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला बीएसएनएलचे नवीन सिम कार्ड मिळेल.
तुम्हाला पोर्टिंग फी म्हणून काही शुल्क देखील द्यावे लागतील.
यानंतर तुमच्या नंबरवर एक संदेश येईल ज्यामध्ये पोर्टिंगची तारीख लिहिलेली असेल. त्या तारखेला तुमचे जुने सिम बंद केले जाईल आणि नवीन सिम चालू केले जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.