कसे करावे JIOFIBER ब्रॉडबँड सेवेसाठी रजिस्ट्रेशन
आपल्या Annual General Meeting (AGM) मध्ये त्यादिवशी Reliance Industries Limited (RIL) ने आपल्या FTTH service सादर करून अनेक मोठ्या घोषणा केल्या. कंपनी आपली Jio Fiber services 5 सप्टेंबर पासून सुरू करेल. या यूजर्स साठी बेस पॅकेज 700 रुपयांचे आहे ज्यात 100Mbps स्पीड मिळतो.
Jio GigaFibre अंतर्गत रिलायंस कंपनी 4K Set-Top बॉक्स पण यूजर्सना मोफत देईल. विशेष म्हणजे हा बॉक्स FTTH ब्रॉडबँडच्या मदतीने मल्टी-प्लेयर ऑनलाइन गेमिंग सोबत मिक्स्ड रियलिटी आणि वीडियो कॉन्फ्रेंसिंगची सुविधा देईल. कंपनी च्या Jio Forever Annual Plans मध्ये यूजर्सना कंपनी फ्री 4K किंवा HD टीवी सोबत हा सेट-टॉप बॉक्स फ्री देत आहे.
हि भेट यूजर्सना Jio Fiber Welcome offer अंतर्गत दिली जात आहे. इतकेच नव्हे तर ऑफर मध्ये यूजर्सना Jio सेट-टॉप बॉक्स मार्फत मूवी च्या रिलीजच्या दिवशीच ती घर बसल्या बघण्याची संधी मिळेल. Netflix आणि Amazon Prime Video सब्क्रिप्शन यूजर्स साठी या सर्विस मध्ये नसतील.
FREE HD, 4K टीवी आणि 4K सेट टॉप बॉक्स साठी काय करावे?
Jio GigaFiber प्लान्स 5 सप्टेंबरला कमर्शियली लॉन्च होतील. Jio Gigafiber चा बेस प्लान Rs 700 प्रति महिन्यांपासून सुरू होतात. तर वार्षिक प्लानच्या किंमती बद्दल कंपनी 5 सप्टेंबरला माहिती देईल. होम ब्रॉडबँड सेवा, वीडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मिक्स्ड रियलिटी अॅप्स व्यतिरिक्त Jio सेट-टॉप बॉक्स आपल्या प्लान्स सोबत सर्व मोठे OTT प्लॅटफॉर्म्स पण उपलब्ध करेल.
त्याचबरोबर सरप्राइज घोषणेअंतर्गत कंपनीने Reliance JioFiber Welcome offer पण सादर केला आहे. यात यूजर्सना फ्री HD किंवा 4K टीवी सोबत 4K सेट टॉप बॉक्स मिळेल. यूजर्सना यासाठी Jio Forever Annual प्लान सब्स्क्राइब करावा लागेल.
कसे करावे JIOFIBER साठी रजिस्ट्रेशन
या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला https://gigafiber.jio.com वेबसाइट वर जावे लागेल, ही JioFiber ची अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागेल, तुम्ही इथे घरचा किंवा तुमच्या कार्यालयाचा पत्ता पण देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी विचारली जाईल. हे सर्व नोंदवल्या नंतर तुम्हाला एक OTP जेनेरेट करावा लागेल.
आता हा OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडी वर मिळेल, कधी कधी हा दोन्हींवर मिळतो. हा OTP टाकल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमचे रजिस्ट्रेशन झाले आहे. आता काही वेळा नंतर या सेवेचा लाभ घेता येईल. हे तितकेच सोप्पे आहे जितके तुम्हाला वाटत आहे.