बहुतेक दूरसंचार कंपन्या आता eSIM ऑफर करतात. Apple iPhone मध्ये फक्त एक फिजिकल सिम स्लॉट आहे. त्यामुळे वापरकर्ते एकी फिजिकल आणि एक eSIM घेतात. तुमच्याकडे दोन फिजिकल सिम असल्यास, त्यातून एक eSIM मध्ये रूपांतरित करायचे आहे ? पण प्रक्रिया तुम्हाला माहिती नाही. तर, काळजी करू नका या लेखात आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत ही प्रक्रिया सांगणार आहोत.
स्मार्टफोन वापरल्यानंतर iOS वर स्विच करणाऱ्या वापरकर्त्यांना eSIM आवश्यक आहे. अशा ग्राहकांनी समस्या सोडवण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.
Airtel eSIM सक्रिय होण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. मात्र, या दोन तासांदरम्यान ग्राहकांच्या सोयीसाठी फिजिकल सिम eSIM सक्रिय होईपर्यंत काम करेल. Airtel चे फिजिकल सिम eSIM मध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
– युजर्सना त्यांच्या रजिस्टर्ड फोन नंबरवरून 121 वर eSIM<> रजिस्टर्ड इमेल ID SMS करा.
– यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर कन्फर्मेशनसाठी SMS मिळेल.
– तुमची eSIM कन्व्हर्ट रिक्वेस्ट कन्फर्म करण्यासाठी 60 सेकंदात 1 टाइप करून रिप्लाय द्या.
– यानंतर 121 वरून दुसरा SMS मिळेल. ते तुम्हाला कॉलवर तुमची परवानगी देण्यास सांगेल.
– जर तुम्ही हे केले नाही तर, तुमची रिक्वेस्ट कॅन्सल केली जाईल.
– कॉलला सहमती दिल्यानंतर तुम्हाला 121 वरून शेवटचा SMS मिळेल. यामध्ये ईमेल आयडीवर येणाऱ्या क्यूआर कोडची माहिती दिली जाईल.
– आता तुमच्या ईमेल आयडीवर एक QR कोड प्राप्त होईल.
– कोड स्कॅन करण्यासाठी, तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा.
– मोबाईल डेटावर क्लिक करा. आता Add Data Plan वर जा आणि Scan QR Code वर क्लिक करा.
– त्यानंतर ईमेल आयडीवर मिळालेला कोड स्कॅन करा.
अशाप्रकारे तुम्हाला QR Code स्कॅन करता येईल. अशाप्रकारे तुम्ही तुमची फिजिकल सिम eSIM मध्ये कन्व्हर्ट करू शकता.