Important! BSNL चा बंद झालेला नंबर ऍक्टिव्ह कसे कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया

 Important! BSNL चा बंद झालेला नंबर ऍक्टिव्ह कसे कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया
HIGHLIGHTS

जुलै महिन्याच्या सुरुवातीला Jio, Airtel आणि VI दरवाढ केली.

दरवाढीमुळे अनेक युजर्स सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळत आहेत.

जर तुमच्याकडे आधीपासूनच BSNL चा नंबर आहे. पण तो बंद झालेला आहे, तर ऍक्टिव्ह करण्यासाठी काय कराल? पहा प्रक्रिया

आपणा सर्वांना माहितीच आहे की, जुलै महिन्याच्या सुरुवातीला Jio, Airtel आणि VI या तिन्ही टेलिकॉम दिग्गज कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या. या दरवाढीचा जनसामान्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता बरेच युजर्स भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळत आहेत. कारण BSNL आपल्या प्लॅनमध्ये अगदी स्वस्त किमतीत मोठे फायदे उपलब्ध करून देते.

जर तुमच्याकडे BSNL मोबाईल नंबर आधीपासूनच उपलब्ध आहे. पण तो काही कारणास्तव बंद झाला असेल, तर तुम्ही तो पुन्हा ऍक्टिव्ह करू शकता. मात्र लक्षात घ्या की, बंद केलेला BSNL सिम क्रमांक केवळ एका ठराविक कालमर्यादेतच पुन्हा सक्रिय केला जाऊ शकतो.

दरवाढीमुळे अनेक युजर्स सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळत आहेत.

Also Read: आगामी Motorola Edge 50 ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल स्मार्ट वॉटर टच फिचर, बघा विशेषता

‘या’ कालावधी दरम्यान नंबर ऍक्टिव्ह करता येतो:

TRAI च्या नियमांनुसार, प्रीपेड मोबाइल वापरकर्त्यासाठी त्याच्या फोनमध्ये विशिष्ट बॅलन्स असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जे वापरकर्ते आउटगोइंग किंवा इनकमिंग कॉल्स, SMS, इ. कोणतीही सेवा सलग 90 दिवस मोबाइल नंबर वापरत नाहीत, असे नंबर निष्क्रिय केले जातात. मात्र, वापरकर्त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो. या कालावधीत सिम रिचार्ज केल्यास, बंद झालेला BSNL क्रमांक पुन्हा सक्रिय केला जाऊ शकतो.

BSNL चा बंद नंबर अशाप्रकारे सक्रिय करा:

जर तुमचे सिम कार्ड हरवले असेल आणि रिचार्ज केले नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून BSNL सिम पुन्हा ऍक्टिव्ह करू शकता. पहा प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला BSNL कस्टमर केअरद्वारे नंबर पुन्हा सक्रिय करण्याची विनंती म्हणेजच रीऍक्टिव्हेशन रिक्वेस्ट करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला जवळच्या BSNL स्टोअरला भेट द्यावी लागेल आणि तुमची रीऍक्टिव्हेशन रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल.
  • येथे रीएक्टिव्हेशन रिक्वेस्टसोबत तुम्हाला तुमचा फोटो आयडी आणि ॲड्रेस प्रूफ देखील सबमिट करावा लागेल.
जर तुमच्याकडे आधीपासूनच BSNL चा नंबर आहे. पण तो बंद झालेला आहे, तर ऍक्टिव्ह करण्यासाठी काय कराल? पहा प्रक्रिया

दुसरीकडे, जर तुमचा BSNL नंबर चुकीच्या CAF मुळे ऑपरेटरने डिस्कनेक्ट केला असेल, तर तुम्ही पुढील प्रक्रियेद्वारे नंबर पुन्हा सक्रिय करू शकता.

  • सर्वप्रथम CSC इन्चार्जसह संपर्क साधावा लागेल आणि तुमचा मोबाइल नंबर परत मिळवण्यासाठी ‘लेखी विनंती’ सबमिट करावी लागेल.
  • यानंतर कार्यकारी तुमचा तपशील तपासेल. जर तुमचा नंबर इतर कोणाला दिला नसेल, तर पोर्टलद्वारे IN बिलिंग इनचार्जला नंबर जारी करण्यासाठी विनंती केली जाईल.
  • व्हेरीफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तोच BSNL मोबाइल नंबर जारी केला जाईल. याव्यतिरिक्त, काही योग्य माहिती किंवा कारणे देऊन विनंती नाकारली देखील जाऊ शकते.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo