एकीकडे प्रीपेड प्लान्स मध्ये बेस्ट देण्याची टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे तर पोस्टपेड मध्ये पण कंपन्या यूजर्स साठी अनेक चांगले आणि आकर्षक प्लान घेऊन येत आहे. असेच काहीसे वोडाफोन मध्ये पण तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्ही Vodafone RED postpaid plans निवडला तर तुम्हाला 16,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळतात. यात तुम्हाला स्ट्रीमिंग सर्विसेसचा एक्सेस, iPhone एक्सचेंज ऑफर, मोबाईल प्रोटेक्शन प्लान आणि खूप काही मिळते. या अंतर्गत येणारे सर्व प्लान्स अनलिमिटेड कॉलिंग, नॅशनल कॉल्स, अनलिमिटेड SMS आणि नॅशनल रोमिंग सह येतात. चला तर बघूया तुम्हाला Vodafone RED postpaid plans अंतर्गत कशाप्रकारे 16,000 रुपयांपर्यतचा फायदा मिळतो.
वोडाफोनच्या या 499 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 75GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सह मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला ZEE5 चा एक्सेस पण मिळतो. इतकेच नव्हे तर तुम्हाला Amazon Prime मेंबरशिप आणि 3,000 रुपयांचा मोबाईल प्रोटेक्शन प्लान पण मिळतो. अशाप्रकारे या प्लान मध्ये एकूण 4,498 रुपयांचे फायदे तुम्हाला मिळतात.
असे iPhone यूजर्स जो अनेकदा आपला फोन बदलत असतात, त्यांच्यासाठी हा खूपच खास प्लान आहे. प्लान 90GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह येतो आणि यात पण Amazon Prime, Vodafone Play आणि ZEE5 सब्सक्रिप्शन फ्री मिळते. त्याचबरोबर तुम्हाला 10 हजार रुपयांचा iPhone forever program फ्री मिळतो ज्यात तुमचा डॅमेज डिस्प्ले रिप्लेस केला जातो. डिस्प्ले बदलने आणि त्यासोबतचा खर्च जर 15,000 रुपयांपेक्षा जास्त झाला तर या प्रोग्राम अंतर्गत तुम्ही तुमचा iPhone एकूण 2,000 रुपये + GST देऊन ठीक करू शकता किंवा बदलू शकता.
वोडाफोनच्या या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला 15,498 रुपयांपर्यतचे बेनिफिट मिळतात, ज्यात Amazon Prime, Vodafone Play आणि ZEE5 सब्सक्रिप्शन आणि सोबत iPhone forever ऑफर पण दिली जात आहे. तुम्हाला यात मोबाईल प्रोटेक्शन प्लान सोबत 1,000 रुपयांचे दोन महिन्यांचे Netflix सब्सक्रिप्शन पण मिळते. डेटा बद्दल बोलायचे तर RED 999 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 100GB डेटा आणि 1,299 रुपयांच्या प्लान मध्ये 125GB डेटा मिळतो.
वोडाफोनच्या या 1,999 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला एकूण 15,998 रुपयांचे बेनिफिट मिळतात. तुम्ही या अंतर्गत तीन महिन्यांच्या Netflix सब्सक्रिप्शन प्लानचा पण लाभ घेऊ शकता. प्लान मध्ये 500GB डेटा रोल-ओवर सह 200GB डेटा पण मिळतो. यात तुम्हाला मोबाईल प्रोटेक्शन प्लान, iPhone Forever ऑफर, Amazon Prime, ZEE5 आणि Vodafone Play सब्सक्रिप्शन मिळते.