Excital चा फास्ट 400 mbps स्पीडचा आकर्षक प्लॅन, Jio-Airtel पेक्षा उत्तम आहे ‘हा’ ब्रॉडबँड प्लॅन

Updated on 14-Oct-2022
HIGHLIGHTS

Excital चा फास्ट 400 mbps स्पीडचा जबरदस्त प्लॅन

या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा मिळेल.

कनेक्शनसाठी तुम्हाला कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही.

जर तुम्ही कमी किमतीत फास्ट ब्रॉडबँड प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी किमतीत 400 Mbps फास्ट स्पीड मिळेल. खरं तर, Exitel ची 400 Mbps प्लॅन कंपनीने ऑफर केलेला सर्वात वेगवान प्लॅन आहे. तुम्हाला वाटत असेल की, हाय स्पीड असल्यामुळे हा प्लॅन खूप महाग असेल, पण Excitel चा 400 Mbps प्लॅन तुमच्या बजेटमध्ये येईल. 

हे सुद्धा वाचा : TIPS : सणासुदीला ऑनलाईन शॉपिंग करताना बचत करा, 'या' महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

400 Mbps प्लॅनमध्ये अनेक पेमेंट पर्याय

Excital 400 Mbps प्लॅन 999 रुपये प्रति महिना ऑफर करतो. परंतु दीर्घ वैधता निवडण्याचा पर्याय देखील आहे. जर तुम्ही तीन महिन्यांसाठी 400 Mbps प्लॅन घेत असाल तर तुम्हाला प्रति महिना 833 रुपये मोजावे लागतील. तुम्ही सहा महिन्यांसाठी प्लॅन निवडल्यास, तुम्हाला दरमहा 699 रुपये द्यावे लागतील. नऊ आणि बारा महिन्यांसाठी, तुम्हाला अनुक्रमे 659 रुपये आणि 599 रुपये प्रति महिना भरावे लागतील. लक्षात घ्या की, रक्कम सर्व महिन्यांसाठी एकरकमी आधारावर द्यावी लागेल. 

तसेच, या किमतीत कर समाविष्ट नाही. मात्र, कनेक्शनसाठी तुम्हाला कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क भरावे लागणार नाही. वापरकर्त्यांना कंपनीने प्रदान केलेल्या ONU डिव्हाइससाठी 2,000 रुपये सुरक्षा ठेव भरावी लागेल. ONU डिवाइसमध्ये दोष असल्यास, Excital म्हणतो की, तक्रार दाखल केल्याच्या दिवसापासून पाच कामकाजाच्या दिवसांत ते बदलण्यात येईल.

प्लॅनमधील उपलब्ध फायदे

चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा मिळेल आणि त्यात कोणतीही FUP मर्यादा नाही. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, प्लॅनमध्ये कोणताही विनामूल्य OTT लाभ नाही. परंतु तुम्ही कंपनीकडून अतिरिक्त मासिक खर्चावर OTT फायदे खरेदी करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :