भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून आलेल्या नवीन नियमांतर्गत भारताच्या मोठ्या DTH आणि केबल टीव्ही ऑपरेटर्सनी नवीन चॅनेल पॅक्सच्या किंमतींची घोषणा केली आहे. ट्राई च्या नवीन फ्रेमवर्क नुसार आता युजर्सना असा कोणत्याही चॅनेल साठी पैसे दयावे लागणार नाहीत जो ते वापरात नाहीत. युजर्स फक्त त्याच चॅनेल साठी पैसे देतील जे त्यांनी स्वतः निवडले आहेत आणि जे ते बघू इच्छितात. एयरटेल डिजिटल टीवी (Airtel DTH Plans 2019) आणि डिश टीवी (Dish TV) ने सर्वात आधी प्रत्येक चॅनेलच्या नाव्ह्या किंमतींची माहिती दिली आहे.
Telecom Regulatory Authority of India च्या लेटेस्ट फ्रेमवर्क अनुसार Cable TV डिस्ट्रिब्युटर्स आणि multi-system operators (MSO) ने आपल्या चॅनेल्सच्या नवीन किंमती शेयर केल्या आहेत. यात Den Networks, Hathway Cable आणि Siti Cable यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या खास आणि मोठ्या डीटीएच कंपन्यांसोबत Dish TV ने पण प्रत्येक चॅनेलची वेगळी किंमत असेलेली यादी सादर केली आहे. ऑपरेटर्स ने प्रकारानुसार चॅनेलची विभागणी केली आहे. Dish TV च्या लिस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनेलना हाइलाइट करण्यात आले आहे.
या चॅनल्स मध्ये युजर्स साठी English News, Hindi Movies, Lifestyle/ Fashion आणि Sports चॅनेल आहेत. त्याचबरोबर लिस्ट मध्ये Star India कडून Hindi HD Premium, Hindi HD Value, आणि Telugu Value; Times Network कडून Times Bouquet 1 HD आणि Times Bouquet 2 HD; Turner International कडून Turner Family Pack आणि Turner Kids Pack from आणि Sony Pictures Networks कडून Happy India 31, Happy India Platinum आणि Happy India HD पण लिस्ट मध्ये आहेत.
आपल्या अधिकृत वेबसाइट वर Airtel Digital TV ने पण चॅनेलच्या किंमतींचा खुलासा केला आहे. कंपनी Star Sports, Sony आणि Zee Cafe सारख्या प्रीमियम चॅनेल साठी दार महिन्याला 20 रुपये ते 22 रुपयांपर्यंत चार्ज करेल. त्याचबरोबर डिश टीवी प्रमाणे Airtel Digital TV ने Star Value आणि Sony Happy India सारखे नवीन पॅक पण सादर केले आहेत.
केबल ऑपरेटर Hathway ने पण युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक चॅनेल पॅक्सचा खुलासा केला आहे. कंपनी कडून 272 रुपयांमध्ये Namma Kannada, 275 रुपयांमध्ये Mana Telugu, 401 रुपयांमध्ये Premium Kannada आणि 271 रुपयांमध्ये Aapla Choice सारखे मंथली पॅक लॉन्च केले गेले आहेत.
Den Networks च्या सुरवातीच्या पॅकची किंमत 4 रुपयांपासून सुरु होऊन 145 रुपयांपर्यंत आहे. हो, हि किंमत कदाचित युजर्सना आकर्षित पण करू शकते. त्याचबरोबर Siti Cable ने पण युजर्स साठी वेगवेगळे पॅक्स लॉन्च केले आहेत. सुरवाती पॅकची किंमत 52 रुपये पासून सुरु होऊन 166 रुपयांपर्यंत आहे. मंथली पॅक व्यतिरिक्त केबल सर्विस प्रोवाइडर आणि डीटीएच ऑपरेटर्स 100 फ्री-टू-एयर चॅनेल साठी दार महिन्याला मॅक्सिमम 130 रुपयांमध्ये चॅनेल विकत घेऊ शकतात.
तुमच्या माहितीसाठी सांगतो TRAI ने सब्सक्राइबर्सना 31 जानेवारी पर्यंतचा वेळ दिला आहे ज्यात ते आपले आवडीचे चॅनेल निवडून त्याचेच पैसे देऊ शकतील.