जाणून घ्या, BSNL आणि रिलायन्स JIO च्या ‘या’ प्लॅन्समधील फरक, किंमत 250 रुपयांपेक्षा कमी

Updated on 10-Aug-2022
HIGHLIGHTS

BSNL आणि रिलायन्स JIO च्या प्लॅन्समधील फरक

प्लॅन्सची किंमत सुमारे 250 रुपयांपेक्षा कमी

Jio चे वर्क फ्रॉम होम प्लॅन्स

BSNL ने अलीकडेच दोन एक महिन्याचे प्लॅन लाँच केले आहेत, जे Jio पेक्षा जास्त फायदे देतात. BSNL चे हे रिचार्ज प्लॅन खूप स्वस्त आहेत आणि ते पॉकेट फ्रेंडली किमतीत सादर करण्यात आले आहेत. या प्लॅन्सची किंमत 250 रुपायांपेक्षा कमी आहे. डेटा आणि कॉलिंग फायद्यांव्यतिरिक्त, हे प्लॅन्स वेब ब्राउझरद्वारे चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेसह देखील येतात. 

BSNL आणि Jio च्या एका महिन्याच्या प्लॅनचे काय फायदे आहेत ते बघुयात, जेणेकरून तुमच्यासाठी कोणता प्लॅन आणि नेटवर्क सर्वोत्तम आहे हे तुम्हाला कळेल:

हे सुद्धा वाचा : 13GB रॅमसह Tecno चा पावरफुल 5G फोन लाँच , 64MP कॅमेरासह मिळेल 33W फास्ट चार्जिंग आणि बरेच काही…

BSNL चा 228 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 228 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 2GB डेटा प्रतिदिन मिळतो. डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत घसरतो. तसेच, पॅकेज दररोज 100 SMSचा लाभ देते. हा प्लॅन एका महिन्यासाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही हा प्लॅन 30 दिवसांच्या महिन्यात घेतला तर तुम्हाला 30 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय, तुम्ही प्लॅन 31 दिवसांच्या महिन्यात खरेदी केल्यास तुम्हाला 31 दिवसांची वैधता मिळणार आहे. म्हणून असेही म्हणता येईल की, ही योजना कॅलेंडर महिन्याच्या आधारावर उपलब्ध आहे.

BSNL च्या 239 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

BSNL च्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्याच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देत आहे. 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळतो. कंपनी या दोन्ही प्लॅनमध्ये चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवा देखील देत आहे.

JIO च्या 181 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

JIO चा 181 रुपयांचा प्लान असून त्याची वैधता 30 दिवस आहे. हा प्लॅन खास अशा लोकांसाठी बनवला आहे, ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला 30GB डेटा मिळेल आणि दैनंदिन डेटा वापरण्याची मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही एकाच दिवसात 30GB डेटा संपवू शकता किंवा तुम्ही दररोज 1GB डेटा देखील वापरू शकता. मात्र, या प्लॅनमध्ये कोणतीही कॉलिंग किंवा मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाही.

JIO च्या 241 रुपयांच्या प्लॅनचे फायदे

 हा प्लॅन सुद्धा वर्क फ्रॉम होम प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये एकूण 40 GB डेटा उपलब्ध आहे. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लॅन असल्याने यामध्ये कॉलिंग किंवा मेसेजिंगची सुविधा असणार नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :