रिचार्ज प्लॅन्सच्या दरवाढीनंतर BSNL मध्ये स्विच करत आहेत युजर्स, जाणून घ्या अप्रतिम आणि आकर्षक बेनिफिट्स
Jio, Airtel आणि Vodafone Idea तिन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स महागले.
अनेक ग्राहक या दरवाढीने त्रासुन BSNL सिम वर स्विच करत आहेत.
'#BSNL_की_घर_वापसी' X म्हणेजच ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
अलीकडेच रिलायन्स Jio, Airtel आणि Vodafone Idea तिन्ही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपला रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL वर स्विच करण्याचा निर्णय घेत आहेत.
एवढेच नाही तर, या कारणास्तव ‘#BSNL_घर_वापसी’ X म्हणेजच ट्विटरवर ट्रेंड करू लागले आहे. जर तुम्ही देखील दरवाढीने त्रासुन BSNL सिम वर स्विच करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला BSNL बेनिफिट्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
BSNL मध्ये स्विच करण्याचे फायदे
स्वस्त प्लॅन्स: एकीकडे Jio, Airtel आणि Vi चे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. तर, दुसरीकडे, BSNL मोबाइल प्लॅन या तीन खासगी कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. BSNL दीर्घ वैधतेसाठी सर्वोत्तम प्लॅन्स ऑफर करते.
4G सर्व्हिस सुरु: 5G नेटवर्क सुरु झाले आहे, तरीही अनेक ग्राहक अजूनही 4G सर्व्हिसमध्ये सहजपणे आपले काम पार पाडत आहेत. एवढेच नाही तर, BSNL ने देखील 4G नेटवर्क लाँच करणे, सुरु केले आहे. याआधीही अनेक मंडळांमध्ये 4G सेवा सुरू आहे. परंतु सध्या संपूर्ण देशात BSNL 4G सेवा उपलब्ध नाही.
एका कॉलवर मदत: तुम्हाला मदत हवी असल्यास, BSNL नंबर ‘1502’ डायल करा, जो देशभरात कुठूनही डायल केला जाऊ शकतो. तुम्ही देशभर पसरलेल्या ग्राहक सेवा केंद्रांशी (CSC) संपर्क करू शकता.
व्हॉइस मेल: जेव्हा तुमचा हँडसेट बंद असेल किंवा तुम्ही व्यस्त असल्यामुळे कॉल घेऊ शकत नाही. तेव्हा BSNL व्हॉइसमेल तुम्हाला तुमच्या कॉलला उत्तर देण्यास सक्षम करते. याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्हॉइसमेल सेट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
अशाप्रकारे, BSNL ग्राहकांना अनेक अप्रतिम आणि आकर्षक बेनिफिट्सचा लाभ मिळतो. जर तुम्हाला या बेनिफिट्सबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर, BSNL च्या अधिकृत साईटला भेट द्या.
BSNL चे स्वस्त लोकप्रिय प्लॅन
BSNL चा 239 रुपयांचा प्लॅन: हा प्रीपेड प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये लोकल, STD आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉल मिळतात. तसेच, यात दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS ची सुविधा देण्यात आली आहे.
BSNL चा 769 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा देखील मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज 100SMS मिळतात. याशिवाय, यात BSNL Tunes, Eros Now Entertainment Subscription, Hardy Mobile Games Services, Challenges Arena Mobile Gaming Service, Listen Music, Lokdhun, Zing, Astrotel आणि GameOn सर्व्हिस मोफत आहेत.
BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. तर, यात दररोज 3GB डेटाची सुविधा देखील मिळेल. प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित गाणे बदलणे, लोकधुन सामग्री आणि मोफत PRBT इरॉस नाऊ सबस्क्रिप्शनची ऑफर देखील आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile