BSNL Winter Bonanza Offer: दर महिन्याला मिळेल तब्बल 1300GB डेटा आणि Unlimited बेनिफिट्स

Updated on 13-Dec-2024
HIGHLIGHTS

BSNL ने त्यांच्या ब्रॉडबँड सर्व्हिस भारत फायबरसाठी विंटर बोनान्झा ऑफर सादर केली आहे.

यूजर्सना सहा महिन्यांसाठी 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सुपरफास्ट FTTH इंटरनेटची सुविधा मिळेल.

अलीकडेच BSNL ने एक नवीन डायरेक्ट-टू-डिव्हाइस D2D सेवा सुरू केली आहे.

BSNL Winter Bonanza Offer: भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ग्राहकांना आकर्षित करण्यात अनेक ऑफर्स सादर करत असते. आता कंपनीने आपल्या युजर्ससाठी विशेष Winter Bonanza Offer आणली आहे. या ऑफरअंतर्गत लोकप्रिय कंपनीने एक अप्रतिम प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला तब्बल 1300GB हायस्पीड डेटा मिळेल. BSNLची ही ऑफर देशातील बहुतांश मंडळांसाठी उपलब्ध आहे. मात्र, दिल्ली आणि मुंबईतील वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. वाचा सर्व तपशील-

BSNL Winter Bonanza Offer

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने त्यांच्या ब्रॉडबँड सर्व्हिस भारत फायबरसाठी विंटर बोनान्झा ऑफर सादर केली आहे. यामध्ये यूजर्सना सहा महिन्यांसाठी 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सुपरफास्ट FTTH इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. या संपूर्ण प्लॅनची ​​किंमत 1,999 रुपये आहे.

या ऑफरअंतर्गत भारत फायबर वापरकर्त्यांना दरमहा 1300GB सुपरफास्ट FTTH इंटरनेट मिळत आहे. त्याबरोबरच, इंटरनेटचा वेग 25Mbps असेल. वापरकर्ते सहा महिन्यांसाठी दरमहा तब्बल 1300GB डेटा वापरू शकतील. 1300GB डेटा संपल्यानंतरही युजर्स 4Mbps स्पीडने इंटरनेट वापरण्यास सक्षम असतील. याव्यतिरिक्त, या कालावधीत युजर्स या ऑफरअंतर्गत अनलिमिटेड लँडलाईन कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

प्लॅनमधील उपलब्ध डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, सहा महिन्यांच्या वैधतेदरम्यान या ऑफरअंतर्गत यूजर्सना दरमहा 333 रुपयांमध्ये 1300GB डेटा मिळतोय. तसेच, अमर्यादित लँडलाइन कॉल्सची सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे, जे मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात. तसेच, मोठ्या प्रमाणात कॉल्स करतात, अशा युजर्ससाठी ही ऑफर खूप उपयुक्त आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अलीकडेच BSNL ने एक नवीन डायरेक्ट-टू-डिव्हाइस D2D सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्ते मोबाईल नेटवर्कशिवायही लोकांना कॉल आणि मेसेज करू शकतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :