BSNL, रिलायंस जियो आणि वोडाफोन चे Rs 300 मध्ये येणार्‍या पोस्टपेड रिचार्ज प्लान्स मधील तुलना

Updated on 03-Oct-2018
HIGHLIGHTS

आज आम्ही तुम्हाला Rs 300 मध्ये येणार्‍या काही प्लान्स मध्ये तुलना करून दाखवणार आहोत. त्याचबरोबर तुमच्यासाठी कोणत्या कंपनीचा प्लान योग्य आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रीपेड यूजर्सना काही सेवांसाठी पोस्टपेड यूजर्सच्या तुलनेत कमी किंमत द्यावी लागते. तसेच प्रीपेड प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर या श्रेणी मध्ये तुम्हाला अनेक लेटेस्ट आणि नवीन रिचार्ज प्लान्स मिळतील. पण पोस्टपेड यूजर्सना अजूनही याच सेवांसाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागतात. पण मागील काही महिन्यांपासून यात खुप बदल होताना दिसत आहेत. आता प्रीपेड प्रमाणेच पोस्टपेड यूजर्स साठी पण जवळपास सर्व टेलीकॉम कंपन्या बेस्ट ऑफर्स आणि प्लान्स घेऊन येत आहेत, आता तुम्हाला पोस्टपेड श्रेणी मध्ये अनेक चांगले प्लान्स मिळतील. 

हे करण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे जुने ग्राहक टिकून राहावेत आणि त्याचबरोबर नवीन ग्राहक मोठ्या प्रमाणात जोडले जावेत. आता काही दिवसांपूर्वी आपण पाहिले होते की बीएसएनएल ने आपल्या काही पोस्टपेड प्लान्स जे Rs 399 च्या किंमतीच्या वर येतात त्यांच्यासोबत अमेजॉन प्राइम चे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन द्यायला सुरवात केली आहे. चला बघुया या श्रेणी मध्ये म्हणजे Rs 300 च्या आत बीएसएनएल, रिलायंस जियो आणि वोडाफोन कडे किती पोस्टपेड प्लान्स आहेत आणि ते तुमच्यासाठी किती योग्य आहेत. 

BSNL चा Rs 299 मध्ये येणारा रिचार्ज प्लान 
बीएसएनएल ने हा रिचार्ज प्लान नुकताच लॉन्च केला आहे. याची किंमत Rs 299 ठेवण्यात आली आहे. तसेच बीएसएनएल च्या या नवीन आणि लेटेस्ट रिचार्ज प्लान मध्ये अनलिमिटेड आउटगोइंग आणि रोमिंग कॉल्स मिळत आहेत. पण या प्लान मध्ये दिल्ली आणि मुंबई सर्कल्स चा समावेश करण्यात आला नाही, आणि असे बीएसएनएल आपल्या प्रत्येक प्लान सोबत करते. बीएसएनएल च्या या नवीन रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 31GB डेटा मिळत आहे. पण यात तुम्हाला कोणतीही डेली FUP लिमिट मिळत नाही. 

रिलायंस जियो चा Rs 199 मध्ये येणारा पोस्टपेड प्लान 
जर रिलायंस जियो च्या Rs 199 मध्ये येणार्‍या प्लान बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त 25GB डेटा प्रतिमाह मिळत आहे. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला 100SMS प्रतिदिन पण मिळत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला यात रिलायंस जियोच्या अॅप्सचा एक्सेस पण मिळत आहे, यात तुम्हाला जियोटीवी, जियोम्यूजिक आणि इतर अनेक अॅप्स मिळतील. 

वोडाफोन चा Rs 299 मध्ये येणारा पोस्टपेड प्लान 
या लेटेस्ट रिचार्ज प्लानची किंमत फक्त Rs 299 आहे पण हा प्लान सहज यूजर्स साठी उपलब्ध नाही. या प्लान साठी तुम्हाला जवळच्या वोडाफोन स्टोर वर जाऊन अप्लाई करावे लागते. या प्लान मध्ये तुम्हाला 20GB डेटा मिळत आहे, तसेच अनलिमिटेड कॉलिंग सोबत 100 SMS प्रतिदिन पण या प्लान मध्ये मिळतील. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :