नव्या रंगरूपात BSNL दाखल! जुने लोगो आणि टॅगलाइन बदलली, 7 नवीन आणि जबरदस्त सेवा सुरु

Updated on 23-Oct-2024
HIGHLIGHTS

BSNL भारतात 4G आणि 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे.

आता BSNL ने नव्या लोगोसोबत आपली टॅगलाईन देखील बदलली आहे.

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 7 नवीन सेवा देखील सुरू केल्या आहेत.

भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL भारतात 4G आणि 5G लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत बातम्या पुढे येत आहेत. असे वृत्त सुरु असतानाच, आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या लोगोचा लूक बदलला आहे. होय, आता BSNL नव्या रंगरूपात दाखल झाला आहे. नव्या लोगोसोबत कंपनीने आपली टॅगलाईन बदलली आहे. एवढेच नाही तर, BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 7 नवीन सेवा देखील सुरू केल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर तपशील-

BSNL चा नवा लोगो

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने मंगळवारी 22 ऑक्टोबर 2024 रोजी आपला नवीन लोगो लाँच केला आहे. तुम्हाला माहितीच असेल की, BSNL चा जुना लोगो लाल आणि निळे बाण आणि राखाडी वर्तुळासह होता. तर, आता ‘कनेक्टिंग इंडिया’ ची टॅगलाइन निळ्या रंगात BSNL मजकूरासह आहे. पण, आता हा लोगो पूर्णपणे बदलला आहे. नवीन लोगोमध्ये राखाडी वर्तुळ आता भगव्या रंगात दिसत आहे. तसेच, निळ्या आणि लाल बाणांना पांढरा आणि हिरवा रंग देण्यात आला आहे. तर, टॅगलाइन आता ‘Connecting India’ ऐवजी ‘Connecting Bharat’ अशी झाली आहे.

BSNL चे नव्या 7 सेवा सुरु

  • BSNL Wi-Fi रोमिंग: प्रथमच कंपनीने रोमिंगसाठी Mi Wi-Fi सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट नेटवर्कचा ऍक्सेस मिळेल.
  • BSNL IFTV अंतर्गत फायबर आधारित लाईव्ह TV सेवा सुरू करण्यात आली आहे, जी 500 हून अधिक प्रीमियम चॅनेल ऑफर करेल. BSNL ने FTTH (फायबर-टू-द-होम) ग्राहकांसाठी राष्ट्रीय Wi-Fi रोमिंग सेवा देखील जाहीर केली. यामुळे ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करता येईल.
  • Any Time SIM (ATS) Kiosks- भारतात प्रथमच Kiosks नावाची सेवा सुरू करण्यात आली आहे. जी ATM सारखी असेल. याद्वारे वापरकर्ते सिम खरेदी करणे, KYC करणे यासारख्या गोष्टी करू शकतील.
  • Direct to Device service: भारतात प्रथमच सॅटेलाइट-टू-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी ऑफर केली जाईल. याद्वारे, नेटवर्क नसतानाही डिव्हाइसला सॅटेलाईटशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
  • Spam Free Network- भारतातील स्पॅम कॉल्स आणि मेसेजसाठी, BSNL ने स्पॅम फ्री नेटवर्क सुरू केले आहे, जे स्पॅम कॉल्सबद्दल रिअल टाइम माहिती प्रदान करेल.
  • BSNL आपत्ती आणि संकटाच्या वेळी सरकार आणि मदत संस्थांसाठी एनक्रिप्टेड संप्रेषण देखील प्रदान करेल. आपत्तींच्या काळात व्याप्ती वाढवण्यासाठी ही सेवा ड्रोन-आधारित आणि बलून-आधारित प्रणाली वापरेल.
  • कंपनीने भारतातील कोळसा खाणींसाठी पहिले कॅप्टिव्ह 5G नेटवर्क देखील सादर केले. C-DAC च्या भागीदारीत आणि स्थानिक पातळीवर उत्पादित 5G उपकरणांचा वापर करून, नेटवर्क भूमिगत खाणी आणि मोठ्या ओपनकास्ट खाणींमध्ये प्रगत AI आणि IoT अनुप्रयोग सक्षम करेल.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :