सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते. Jio आणि Airtel शी स्पर्धा करण्यासाठी, BSNL ने अलीकडेच अनेक उत्तम ऑफर्ससह प्लॅन्स लाँच केले आहेत. BSNL च्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन्स आहेत, जे भरपूर डेटा आणि वैधता प्रदान करतात. चला तर मग BSNL च्या टॉप 5 प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! 50MP कॅमेरा Lava Blaze 2 5G फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये लाँच, बघा सर्व फीचर्स आणि स्पेक्स
BSNL चा 347 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्रीपेड प्लॅन दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. याशिवाय, यामध्ये दररोज 100 SMS ही उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये M/s OnMobile Global Limited द्वारे Progressive Web App (PWA) वर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सेवेचा अतिरिक्त लाभ देखील समाविष्ट आहे.
BSNL चा रिचार्ज प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा देखील मिळतो. हा पॅक होम आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर करतो. हे मोफत BSNL ट्यून आणि लोकधुन कंटेंटसह दररोज 100 SMSचा लाभ देखील देतात.
BSNL प्रीपेड प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा पॅक दिल्ली आणि मुंबईसह स्थानिक आणि राष्ट्रीय रोमिंगवर अमर्यादित व्हॉइस कॉल ऑफर करतो. याशिवाय, प्लॅन वैधतेच्या संपूर्ण कालावधीसाठी 300 SMS देत आहे. मात्र, लक्षात घ्या की, हा प्लॅन कोणत्याही इंटरनेट डेटासह येत नाही.
BSNL च्या प्रीपेड प्लॅनची वैधता 82 दिवसांची आहे. हा पॅक दिल्ली आणि मुंबईसह स्थानिक आणि STD नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. यामध्ये दैनंदिन 1.5GB डेटासोबतच दररोज 100SMS ची सुविधाही उपलब्ध आहे.
BSNL चा STV 499 रिचार्ज प्लॅन 75 दिवसांच्या वैधतेसह येतो. पॅकमध्ये दररोज 1GB डेटा उपलब्ध आहे. या पॅकमध्ये लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉल्सची सुविधा मिळेल. या प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी BSNL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.