लवकरच SMS द्वारे डेटा कनेक्टिविटी सेवा देणार आहे BSNL

लवकरच SMS द्वारे डेटा कनेक्टिविटी सेवा देणार आहे BSNL
HIGHLIGHTS

भारतात अशा प्रकारची सेवा याआधी कोणत्याही टेलीकॉम कंपनी ने जाहीर केली नाही, याचा अर्थ असा आहे कि बीएसएनएल अशाप्रकरची सेवा लॉन्च करणारी पहिली टेलीकॉम कंपनी असेल.

गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत कि बीएसएनएल ने अनेक रिचार्ज प्लान्स लॉन्च केले आहेत. कंपनी कडे आता इतके प्लान्स आहेत कि ती कोणत्याही इतर टेलीकॉम कंपनीला चांगली टक्कर देऊ शकते. पण आता कंपनी एक नवीन प्लान आणणार आहे, जो यूजर्सना SMS पाठवण्यास मदत करणार आहे. कंपनी ने टेलीकॉम टॉक च्या एका रिपोर्टनुसार फ्रान्सची एक कंपनी Be-Bound सह भागेदारी केली आहे, या भागेदारी अंतर्गत आता यूजर्स म्हणजे बीएसएनएल यूजर्स डेटा कनेक्टिविटीचा वापर करून पण SMS पाठवू शकतात.

आता पर्यंत यूजर्स आपल्या मेन अकाउंट बॅलेन्सचा वापर करूनच एखादा SMS करू शकत होते. पण बीएसएनएल द्वारा लॉन्च केल्या जाणाऱ्या या सेवेनंतर सर्व बीएसएनएल यूजर्स आपल्या डेटाचा वापर करून SMS पाठवू शकतात.

विशेष म्हणजे अलीकडेच बीएसएनएल ने अजून काही पाऊले उचलली आहेत जी काही यूजर्सना आवडत नाही आहेत. BSNL ने आपल्या यूजर्ससाठी दोन नवीन घोषणा केल्या आहेत, आणि या दोन्ही बातम्यांमुळे बीएसएनएल चे यूजर्स जास्त खुश होणार नाहीत. पहिली घोषणा पाहता हि Rs 99 मध्ये येणाऱ्या वॉयस कॉलिंग प्लान संबंधित आहे. या प्लान मध्ये तुम्हाला आतापर्यंत जी वैधता मिळत होती, ती कंपनीने कमी केली आहे.

तसेच दुसऱ्या घोषणेबद्दल बोलायचे तर हि सिम रिप्लेसमेंट संबंधीत आहे. हि बातमी ऐकून तुम्ही जास्त खुश होणार नाही, कारण बीएसएनएल ने आता आपली सिम रिप्लेसमेंट फी वाढवून Rs 100 केली आहे.

Rs 99 मध्ये येणाऱ्या BSNL रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये तुम्हाला आतापर्यंत जवळपास 26 दिवसांची वैधता मिळत होती, पण आता हि 2 दिवसांनी कमी करून मात्र 24 दिवस करण्यात आली आहे. याचा अर्थ असा कि आता तुम्हाला दोन दिवस कमी वॉयस कॉलिंग मिळणार आहे. बीएसएनएल बद्दल बोलायचे तर कंपनी कडे एक Rs 319 मध्ये येणार प्रीपेड प्लान पण आहे जो तुम्हाला 90 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देत आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo